suvendu adikari and dilip ghosh 
देश

बंगाल भाजपमध्ये खदखद; TMC मधून आलेले नेते ठरताहेत डोकेदुखी

कार्तिक पुजारी

विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून बंगालमधील भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाहीये. टीएमसीमधून आलेले नेते भाजपची डोकेदुखी ठरु लागले आहेत.

कोलकाता- विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून बंगालमधील भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाहीये. टीएमसीमधून आलेले नेते भाजपची डोकेदुखी ठरु लागले आहेत. दुसरीकडे, पक्षामध्ये बाहेरचे आणि आतमधले असा संघर्ष सुरु झाला आहे. मंगळवारी सुवेंदू अधिकारी दिल्लीतील भाजप हाय कमांडशी भेट घेत होते, त्याचवेळी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेत होते. विशेष म्हणजे या बैठकीला वरिष्ठ नेते मुकुल रॉय आणि राजीव बॅनर्जी उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना तोंड फुटलं आहे. मुकुल रॉय पोस्ट कोविड तक्रारीमुळे विलगीकरणात आहेत, तर राजीव बॅनर्जी यांनी व्यक्तिगत कारण देत बैठकीला दांडी मारली. (west bengal bjp unit suvendu adhikari delhi and dilip ghosh meeting tmc)

अनेक आमदार आणि खासदारांची घरवापसी इच्छा

विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले नेते परत जाण्यासाठी इच्छुक आहेत. माजी आमदार सोनाली गुहा, फुटबॉलर ते पॉलिटिशियन झालेले दिपेंदु विश्वास यांना पुन्हा टीएमसीमध्ये जायचं आहे. अनेक नावे सध्या चर्चेत आहेत. स्थानिक माध्यमानुसार टीएमसीच्या संपर्कात असणाऱ्या नेत्यांची संख्या 10 वरुन 33 वर पोहोचली आहे.

बाहेरच्यांना महत्व मिळत असल्याने जुने भाजप नेते नाराज

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक टीएमसी नेते भाजपमध्ये आले. पण, भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनी त्यांचा स्वीकार केलेला नाही. शिवाय बाहेरुन आलेल्या नेत्यांना महत्व मिळत असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. नुकतेच बाहेरुन आलेले सुवेंदू अधिकारी यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी अनेक नेत्यांना डावलून भाजपने टीएमसीमधून आलेल्या नेत्यांना तिकिट दिले होते. सुवेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची माहिती आहे.

मुकुल रॉय भाजपसाठी डोकेदुखी

मुकुल रॉय सध्या भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं कळत आहेत. शिवाय टीएमसीने त्यांच्याकडे मैत्रिचा हात पुणे केलाय. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेख बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली होती. या भेटीमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: फोन करुन याबाबत मुकुल रॉय यांच्याशी चर्चा केली होती. विधानसभेच्या पराभवातून सावरु न शकलेल्या भाजपला पक्षांतर्गत समस्या जाणवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT