देश

ममता बॅनर्जींनी दिल्लीत घेतली PM मोदींची भेट; म्हणाल्या...

विनायक होगाडे

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काल सोमवारी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यासाठी दिल्लीला पोहोचल्या. त्यांनी आज मंगळवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासहित काँग्रेसचे नेते आनंद शर्मा आणि कमलनाथ यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी आज सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधान मोदींशी कोरोना महासाथीबद्दल चर्चा झाली तसेच माझ्या राज्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात लशीचा पुरवठा करण्याची देखील मागणी केली.

ममता बॅनर्जी यांनी पुढे म्हटलंय की, मी पंतप्रधा नरेंद्र मोदींना सांगितलंय की पश्चिम बंगालला कमी लस मिळाल्या असून आम्हाला आणखी लशींची गरज आहे. तसेच मी पंतप्रधानांना पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची देखील मागणी केली आहे. तसेच मी राज्याचे नाव बदलण्याचा प्रलंबित मुद्दा देखील उचलला आहे. यावर पंतप्रधानांनी लक्ष घालू असं उत्तर दिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, मोदींशी झालेल्या चर्चेतील सगळ्याच बाबी सार्वजनिक केल्या जाऊ शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT