Alapan Bandopadhyay 
देश

केंद्राच्या नोटिसीला अलपन बंडोपाध्याय यांनी दिलं उत्तर

कार्तिक पुजारी

पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (Alapan Bandopadhyay) यांनी केंद्र सरकारच्या नोटिसीला गुरुवारी उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली- पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (Alapan Bandopadhyay) यांनी केंद्र सरकारच्या नोटिसीला गुरुवारी उत्तर दिलं आहे. एक अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली. केंद्र सरकारने अलपन बंडोपाध्याय (West Bengal chief secretary Alapan Bandyopadhyay ) यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत Disaster Management Act नोटिस पाठवली होती. नोटिसाला तीन दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. चक्रीवादळ यास संबंधातील केंद्राच्या बैठकीला 15 मिनिटे उशिरा रिपोर्ट केल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. (West Bengal ex chief secretary Alapan Bandyopadhyay mamta banarjee notice answer)

सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार बंडोपाध्याय यांनी आपल्या उत्तरात सांगितलं की, ''मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या निर्देशानुसार चक्रीवादळ यासमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहण्यासाठी दीघा येथे गेले होते. त्यामुळे ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. दीघा हे पूर्व मेदिनीपुर जिल्ह्यातील एक लोकप्रिय समु्री रिसॉर्ट आहे.'' केंद्रीय गृहमंत्रालयाने 31 रोजी बंडोपाध्याय यांना नोटिस पाठवली होती. या अंतर्गत बंडोपाध्याय यांना 2 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

NARENDRA modi and mamta banarjee

बंडोपाध्यात 31 मे रोजी मुख्य सचिव म्हणून निवृत्त होणार होते. पण, कोरोना काळातील त्यांची जबाबदारी लक्षात घेता राज्य सरकारने त्यांची सेवा तीन महिन्यांसाठी वाढवली होती. याच काळात केंद्र सरकारने त्यांना दिल्लीमध्ये रिपोर्ट करण्यास सांगितलं होतं. पण, खरा वाद त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला उपस्थिती न लावल्याने निर्माण झाला. यासंदर्भात बंडोपाध्याय यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली होती. बंडोपाध्याय यांच्या कृतीमुळे IAS पद्धतीला तडा जाऊ शकतो आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

पंतप्रधान मोदींची यास चक्रीवादळाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत बैठक बोलावली होती. यावेळी पंतप्रधानांनी 15 मिनिटे मुख्य सचिवांच्या येण्याची वाट पाहिली. अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना बैठकीसाठी येणार आहात काय, याबाबत विचारणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय बैठकीसाठी हजर झाले. पण, त्यांनी लगेच दुसऱ्या बैठकीचा हवाला देत तिथून पळ काढला, असं नोटिसमध्ये म्हणण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT