Railway Accident sakal
देश

Railway Accident : प. बंगालमध्ये मालवाहू गाडीची एक्स्प्रेसला धडक; ९ ठार ४१ जखमी

आगरताळ्यावरून सियालदाहच्या दिशेने जाणाऱ्या कांचनजुंगा एक्स्प्रेसला मालवाहू गाडीने मागच्या बाजूने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

जलपायगुडी- कोलकता - आगरताळ्यावरून सियालदाहच्या दिशेने जाणाऱ्या कांचनजुंगा एक्स्प्रेसला आज सकाळी नऊच्या सुमारास मालवाहू गाडीने मागच्या बाजूने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अन्य ४१ जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये हा अपघात घडला.

कांचनजुंगा एक्स्प्रेसला धडक देणाऱ्या मालवाहू गाडीच्या चालकाची यात कोणताही चूक नसल्याचे उघड झाले आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर त्या गाडीला सर्व रेड सिग्नल ओलांडण्याची परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रानीपात्रा स्थानकावरील स्टेशन मास्तरने लिहिलेल्या ‘टीए- ९१२’ या दस्तावेजात तसा उल्लेख करण्यात आला आहे.

रानीपात्रा रेल्वे स्थानक ते छत्तरहाट जंक्शनदरम्यान नऊ सिग्नल असून संबंधित मालवाहू गाडीला रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करून आहे त्या वेगाने पुढे जाण्यास सांगण्यात आले होते. राज्य आणि केंद्र सरकारची यंत्रणा स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातस्थळी बचाव कार्य राबवीत आहे.

मृतांमध्ये मालवाहू गाडीचा पायलट, को-पायलट आणि सुरक्षा रक्षकाचा देखील समावेश आहे. या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातामधील जखमींना तातडीने उपचारासाठी उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे झाला हा अपघात

उत्तर बंगालच्या न्यू जलपायगुडी रेल्वेस्थानकापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगापानी स्थानकाजवळ मालवाहू गाडीने एक्स्प्रेसला मागच्या बाजूने जोराची धडक दिल्याने या गाडीचे डबे रुळावरून खाली घसरले. ही धडक एवढी जोरात होती की त्यामुळे गाडीच्या डब्यांचे मोठे नुकसान झाले.

या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना मृतांच्या नातेवाइकांच्या दुःखामध्ये आपण पूर्णपणे सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली. ‘या अपघातातील जखमी लवकर बरे व्हावेत म्हणून मी प्रार्थना केली असून परिस्थितीचा देखील आढावा घेतला आहे. जखमींना मोठ्या प्रमाणावर मदत केली जात असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

केंद्राकडून मदत जाहीर

या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपयांची तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. किरकोळ जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येईल असे मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस गाडी ही रूळावर थांबली असताना मालवाहू गाडीने तिला मागच्याबाजूने जोराची धडक दिली. यामुळे कांचनजुंगा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले तर अन्य डबा थेट इंजिनवर चढल्याने तो हवेत अधांतरीच अडकला.

मदत कार्यात हवामानाचा अडथळा

सध्या या भागातील वातावरण अधिक प्रतिकूल असल्याने मदत आणि बचाव कार्यात यंत्रणेला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या अपघातामुळे मागील वर्षी कोरोमंडल एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या असून त्यामध्ये तीनशे नागरिकांचा मृत्यू झाला होता तर एक हजारांपेक्षाही अधिक प्रवासी हे जखमी झाले होते.

दिवसभरात

  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून दुर्घटनेचा आढावा

  • मुख्यमंत्री, राज्यपाल घटनास्थळाला भेट देणार

  • केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी दाखल

  • शिल्लक सुरक्षित डब्यासह एक्स्प्रेस कोलकत्याकडे रवाना

  • अपघातामुळे उत्तर बंगालमधील वाहतुकीला फटका

  • प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वेगळ्या बस गाड्यांची सोय

या गाड्यांचा मार्ग बदलला

  • गुवाहाटी- सराईघाट एक्स्प्रेस

  • गुवाहाटी- बंगळूर एक्स्प्रेस

  • एनजेपी- हावडा वंदे भारत

  • कामरूप एक्स्प्रेस

  • उत्तरबंगा एक्स्प्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT