File Photo File Photo
देश

डेथ सर्टिफिकेट दिलं अन् अंत्यसंस्काराआधी जिवंत मिळाला

नामदेव कुंभार

देशात कोरोना महामारीच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या बोजवाऱ्यामुळे अनेंकाचा मृत्यू झाला आहे. यातच देशातील अनेक रुग्णालयाचा बेजबादारपणाही समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील एका कोविड रुग्णालयाचा बेजाबदारपणा समोर आलाय. डेथ सर्टिफिकेट (death certificate) जारी करण्यात आल्यानंतर स्मशानभूमीतील कर्मचारी मृतदेह आणायला रुग्णालयात गेले तर रुग्ण खाटेवर बसला असल्याचे आढळून आले. पश्चिम बंगालमधील (west-bengal) हिजुली येथील नेताजी सुभाष कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला.

हिजुली येथील एका २६ वर्षीय तरुणाला ताप आणि छातीत कळ आल्याने कुटुंबीयांनी राणाघाट रुग्णालयात दाखल केले. तेथे कोरोना संसर्गाचे निदान झाल्यामुळे त्याला कल्याणीत हलविण्यात आले. त्याच्यावर गेले चार दिवस उपचार सुरु होते. त्याचे निधन झाल्याचा संदेश शुक्रवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने कुटुंबीयांना पाठविला. त्यांना शनिवारी मृत्युचा दाखला देण्यात आला.

स्मशानभूमीचे कर्मचारी रुग्णालयात गेल्यानंतर हा तरुण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूच्या प्रमाणपत्रावर त्याच्या वडीलांचे निधन झाल्याचाही उल्लेख होता, मात्र प्रत्यक्षात ते हयात आहेत. या प्रकारानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणाला दुसऱ्या रुग्णालयात हलविले. याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, तसेच पूर्ण माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT