Crime Scene esakal
देश

West Bengal : बंगालमध्ये पुन्हा हिंसा; भाजप आमदारासह अनेक पोलिस जखमी

सकाळ डिजिटल टीम

West Bengal News : बिहारमध्ये हिंसेचा वणवा पेटलेला असतांना पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. हुगळी येथे काढलेल्या शोभायात्रेमध्ये जोरदार दगडफेक करण्यात आली. हुगळीतल्या रिशरामध्ये ही घटना घडली आहे.

रामनवमीनिमित्त हुगळीमध्ये हिंदू संघटनेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. याच दरम्यान जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष सहभागी झाले होते. ते गेल्यानंतर दोन गट अचानक समोरासमोर आले आणि दगडफेक सुरु झाली. मोठ्या प्रमाणावर जाळपोळही झाली आहे.

या शोभायात्रेचं आयोजन भाजप, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आलेलं होतं. या हिंसाचारामध्ये भाजप आमदार बिमन घोष जखमी झाल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.

या घटनेमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलिससुद्धा जखमी झाले आहेत. जेव्हा ही शोभायात्रा रिशराच्या संध्या बाजारात पोहोचली तेव्हा अचानक दगडफेक सुरु झाली.

भाजपजे नेते दिलीप घोष म्हणाले की, शोभायात्रेमध्ये महिला आणि मुलांवर दगडफेक करण्यात आली. हावडामध्ये झालेल्या हिंसेनंतरही राज्य सरकार कोणतीच करावाई करत नाहीये. दगडफेक होतेय, वाहनांची तोडफोड होतेय तरीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT