Narendra Modi Mamata Banerjee esakal
देश

West Bengal Panchayat Election : बंगालमध्ये पुन्हा 'ममताराज', भाजपसाठी पण गुडन्यूज

रोहित कणसे

पश्चिम बंगाल येथील पंचायत निवडणूकीचे निकाल समोर येत आहेत. राज्यात सत्तारुढ तृणमूल काँग्रेस या निवडणुकीत आघाडीवर आहे. या निवडणूकीत टीएमसी आणि भाजप या दोन पक्षात सामना पाहयला मिळाला. यादोन्ही पक्षांमध्ये टीएमसी खूप मोठ्या फरकाने आघाडीवर असली तरी भाजपची यावेळच्या निवडणुकीत कामगिरी उंचावली असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने २०१८ साली ५७७९ जागांवर रेकॉर्ड मोडत आतापर्यंत ८२०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. अद्याप २५ टक्के जागांचे निकाल येणे बाकी आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवलं आहे. दोन वर्षांपूर्वी तृणमूलने विधानसभा निवडणुकीत सलग तिऱ्यांदा विजय मिळवला होता. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री ११.३० वाजता जाहीर केलेल्या निकालानुसार पश्चिम बंगालमधील त्रिस्तरीय पंचायत निवडणूकीत त्यांचा विरोधकांना मागे टाकले आहे.

टीएमसीने ३०,३९१ जागा जिंकल्या आगेत तर ते १,७६७ जागांवर आघाडीवर आहेतय तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने ८,२३९ जागांवर विजय मिळवला आहे तर ४४७ जागांवर आघाडी घेतली आहे. राज्यात एकूण ६३,२९९ ग्राम पंचायत जागांसाठी मतदान झालं आहे.

समोर आलेल्या निकालांनुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा)ने २,५३४ जागांवर विडय मिळवला आहे. काँग्रेसने २,१५८ जागांवर विजय मिळवला तर १५१ इतर जागांवर पक्षाचे उमेदवार अघाडीवर आहेत.

तर सत्तारुढ तृणमूल काँग्रेस २,६१२ पंचायत समिती जागांवर विजयी झाली आहे आणि इतर ६२७ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपने आतापर्यंत पंचायत समितीच्या २७५ जागा जिंकल्या आहेत तर १४९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर माकप ६३ जागांवर विजय आणि ५३ जागांवर आघाडी तर काँग्रेसने ५० जागा जिंकल्या आहेत. राज्यात ९,७२८ पंचायत समिती जागांसाठी मतदान झाले आहे.

तृणमूल काँग्रेसने आतापर्यंत घोषित जिल्हा परिषदेच्या सर्व ८८ जागांवर विजय मिळवला आहे तर इतर १६३ जागावर आघाडी घेतली आङे. तर माकपाने चार जागा आणि काँग्रेसने दोन तर भाजपने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. राज्यात एकूण ९२८ जिल्हा परिषद जागा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: लोणीमधील शेतकरी मेळाव्याला शाहांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT