देश

Viral Video: काळजाचा चुकेल ठोका, चालत्या ट्रेनमधून दिलं ढकलून

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

सकाळ डिजिटल टीम

West Bengal Train Viral: पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वेमध्ये किरकोळ भांडणानंतर प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिलं आहे. या घटनेत प्रवासी जबर जखमी झाला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर त्या तरुणाला बाहेर ढकलून देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेकॉर्ड केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (west bengal Passenger thrown out of speeding train)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीरभूम जिल्ह्यातील तारापिठ रोड आणि रामपुरहाट रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली आहे. हावडाहून मालदाकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये हे दोघे प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर दोघांमध्ये काही किरकोळ गोष्टीमुळे वाद झाले. काही वेळातच हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. दरम्यान, एका प्रवाशाला राग आल्यामुळे भांडण करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला ढकलत चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले.

रेल्वेतून खाली पडलेला तो प्रवासी रेल्वे पोलिसांना रक्तबंबाळ अवस्थेत रुळांवर सापडला. सजल शेख असे जखमी प्रवाशाचे नाव असून तो बीरभूममधील रामपुरहाटचा रहिवासी आहे. रेल्वे पोलिसांनी तारापीठ ते रामपुरहाट रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे मार्गावरून सजलचा शोध घेतला. त्या नंतर त्याला रामपूरहाट शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. सजल शेखची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT