West Bengal
West Bengal Sakal
देश

West Bengal: अधिवेशनात गोंधळ; राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळलं

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवत भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात गोंधळ घालत धरणे आंदोलन सुरू केल्याने राज्यपाल जगदीप धनकर यांच्या अभिभाषणात अडथळे आणले. त्यामुळे राज्यपालांना अभिभाषणाची पहिली आणि शेवटची ओळच वाचता आली. दरम्यान, या गोंधळाबद्धल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

गेल्यावर्षी ममता बॅनर्जी निवडून आल्यानंतर पश्‍चिम बंगाल सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज दुपारी विधानभवनात राज्यपाल जगदीप धनकर पोचले. परंतु भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. घोषणाबाजी केली. राज्यपालांच्या अभिभाषणात अडथळे आणले.

राज्यपालांनी भाजप आमदारांना शांत राहण्याचे आवाहन केले, परंतु ते शांत झाले नाही. त्यामुळे राज्यपाल सभागृहाबाहेर जात असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. शेवटी राज्यपालांचे भाषण विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आले. या गोंधळामुळे राज्यपालांना अभिभाषणातील पहिली आणि शेवटची ओळ वाचता आली. दरम्यान, या घटनेबद्धल ममता बॅनर्जी यांनी टीका करत म्हटले की, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.

भाजपने नियोजितपणे गोंधळ घातला आहे. ही सभ्यता नाही. कोणाला कसा मान द्यायचा हे भाजपच्या लोकांना ठावूक नाही. लोकशाही म्हणजे गोंधळ घालणे नाही. सर्व गमावूनही ते असा गोंधळ घालत आहेत. आम्ही तासभर वाट पाहिली. परंतु भाजपची नौंटकी सुरूच होती. लोकशाहीसाठी ही बाब लाजिरवाणी आहे. विरोध तर होतोच, परंतु राज्यपालांना अभिभाषणात अडथळे आणले जात नाही. राज्यपालांना आम्ही विनंती केली. हात जोडून त्यांना एकतरी ओळ वाचा, असे सांगितले. परंतु जे काही शेवटी घडले, त्यात लोकशाहीचा विजय झाला, मी या घटनेने दु:खी झाले आहे. भाजपने आज जे काही केले, ते लोकशाहीचा अपमान करणारे आहे.

अनेक राज्यांत असे घडते, परंतु ही घटना खरोखरच अनाकलनीय होती. राज्यपाल हे अभिभाषण न करताच जाण्याची तयारी करत होते. परंतु घटनेचे संरक्षण करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष आणि आम्ही त्यांना विनंती केली. राज्यपाल अभिभाषण करणार नाही, असे घडत नाही. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होतो. तृणमूलचे आमदार आणि महिलांनी राज्यपालांना अभिभाषण करण्याची विनंती करत होते आणि त्याचे वाचन केल्याशिवाय जावू नये, असे सांगत होते. दरम्यान, विधानसभेत अभिभाषणाबद्धल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवन येथे जावून राज्यपालांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT