Crime sakal
देश

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

दक्षिण-२४ परगणा जिल्ह्यामध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पीटीआय

कोलकता - पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेनंतर पेटलेला आंदोलनाचा वणवा शांत होत नाही तोच येथील दक्षिण-२४ परगणा जिल्ह्यामध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिकांनी आंदोलन करत पोलिस ठाण्यालाच आग लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. संतप्त जमावाने माहिष्मरी पोलिस ठाण्याला आग लावत तुफान दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले. पोलिस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची देखील जमावाकडून तोडफोड करण्यात आली.

जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांना घटनास्थळावरून पळ काढावा लागल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या सगळ्या राड्यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येते.

पीडित मुलीच्या आई वडिलांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली होती पण पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यावर तातडीने कारवाई न केल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. ज्या पद्धतीने आर जी कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना दाबण्याचा प्रकार घडला तसाच काहीसा प्रकार येथेही घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या प्रकरणामध्ये नराधमांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू ज्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यास चालढकल केली त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी योग्यपद्धतीने कारवाई केली असती तर या प्रकरणामध्ये मुलीचे प्राण वाचले असते.

- गणेश दौली, स्थानिक नागरिक

खासगी कोचिंग क्लासमधून परतणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये आता महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. राज्यात एकीकडे नवरात्रोत्सव सुरू असताना देखील अशा प्रकारची स्थिती कायम आहे. महिलांना संरक्षण देण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अपयशी ठरल्या आहेत.

- सुकांता मुजुमदार, केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष

डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि खूनप्रकरणाचा निषेध करण्यासाठी निवासी डॉक्टरांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन आजही सुरूच होते. ‘तुम्ही जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी संघर्ष करत असता तेव्हा विजय सोपा नसतो. आम्हाला राज्य सरकारने चांगली वागणूक द्यावी एवढीच अपेक्षा आहे. पोलिसांकडून होणारा लाठीमार आणि शिवीगाळ आम्हाला अपेक्षित नाही. राज्य सरकारने माफी मागायला हवी,’ असे आंदोनलकर्ते डॉक्टर देवाशिष हल्दर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT