देश

West Bengal: अर्पितासाठी दीड कोटींचा प्रीमियम भरत होते 'ममतां'चे मंत्री

शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्याविरोधात 58 दिवसांनी दोषारोप पत्र दाखल

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असणारे माजी शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्याविरोधात 58 दिवसांनी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. ही चार्जशीट सोमवारी बँकशाल कोर्टात सादर करण्यात आली आहे. या दोषारोप पत्रामद्धे काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या 31 एलआयसी पॉलिसींचा यामध्ये उल्लेख करण्यात आलाय.

या पॉलिसिंच्या प्रीमियमसाठी पार्थ चटर्जी वर्षाला दीड कोटी रुपये भरत होते, असा आरोप ईडीने केला आहे.

या 31 पैकी बहुतांश पॉलिसींचे प्रीमियम 50 हजार आहे तर काही पॉलिसी 45 हजार रुपये आहेत. पार्थ चटर्जी यांच्या मोबाइल फोनच्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे.

ईडीने केलेल्या दाव्यानुसार, बँकेच्या कागदपत्रावरून पॉलिसीच्या प्रीमियमची माहिती मिळाली आहे. अर्पिता मुखर्जींच्या 31 प्रीमियमसाठी पार्थ चटर्जी बँकेत पैसे जमा करत होते.या माहितीच्या आधारे, ईडीने कोर्टात दावा केला आहे की, बँकेत एकूण दीड कोटी रुपये जमा होते. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने ही माहिती दिली असल्याचं ईडीने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT