West Bengal Woman
West Bengal Woman esakal
देश

कडक सॅल्यूट! भावाच्या लग्नात उरलेलं 'अन्न' गोरगरीबांना केलं 'दान'

सकाळ डिजिटल टीम

भारतातील विवाहसोहळा हा एक भव्य सोहळा आहे, ज्यात अनेक कार्ये आणि समारंभ असतात.

विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास 'लग्नगाठ' म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे. भारतातील विवाहसोहळा हा एक भव्य सोहळा आहे, ज्यात अनेक कार्ये आणि समारंभ असतात. 'अन्न' हा अशा विवाहसोहळ्याचा अविभाज्य भाग आहे आणि बहुतेक वेळा कुटुंबं त्यांच्या पाहुण्यांना कोणी उपाशी राहू नयेत, याची खातरजमा करतात. त्यामुळं या प्रक्रियेत भरपूर अन्न वाया जातं. अशा स्थितीत बंगालमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेली आणि गरिबांना लग्नाचं उरलेलं अन्न वाटप करताना एक स्त्री दिसतेय. कचरा कमी करणं किंवा बेघरांना अन्न पुरवण्याचं उद्दिष्ट हे काही खोलवर रुजलेलं तत्व आहे, की नाही याची कल्पना नाही, पण तरीही स्त्रीचा प्रयत्न खूप प्रेरणादायी आहे.

छायाचित्रकार निलांजन मोंडल (Photographer Nilanjan Mondal) यांनी फेसबुकवरील वेडिंग फोटोग्राफर्स पेजवर हा क्षण शेअर केलाय. मोंडलनं या महिलेची ओळख पपियाकार (Papiya Kar) अशी केलीय, जी आपल्या भावाच्या लग्नात उरलेलं अन्न गरिबांना खाऊ घालताना दिसतेय. कोलकाता Kolkata उपनगरीय रेल्वे स्थानकावरील राणाघाट जंक्शन (Ranaghat Junction) येथे ५ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या फोटोंत ती महिला पारंपरिक लग्नाचा पोशाख परिधान करुन कागदाच्या प्लेटवर स्वतःहून जेवण देताना दिसतेय. ज्या प्लॅटफॉर्मवर ती अन्नदान करत होती, तिथं सर्व वयोगटातील लोक जमले होते. या पदार्थांमध्ये दाल, रोटी, सब्जी आणि भाताचा समावेश होता.

या फेसबुक पोस्टला 1,200 हून अधिक लोकांनी लाईक केलंय, तर अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. काहींनी म्हंटलंय, हे काही वेगळं नाही, हे नेहमीचच आहे. या महिलेनं यापूर्वी देखील गरिबांना जेवण खाऊ घातलं होतं. बंगालीमधील एका युजर्सनं आपल्या भाषेत या महिलेच्या दयाळू कृत्याचं कौतुक केलंय. त्यानं म्हंटलंय, प्रत्येकाची मानसिकता समान असेल तर समाज एक चांगलं स्थान निर्माण करु शकेल. ग्रेट जॉब, ग्रेट वर्क आणि तुमचा खूप अभिमान आहे, अशी कमेंटही त्यानं केलीय. काही दिवसांपूर्वी 10 वर्षांची लायला (Lyla), तिच्या पायाच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी कुकीज विकायची, तिला एका इंस्टाग्राम युजर्सकडून सर्वात अनपेक्षित मार्गानं मदत मिळाली. चार्ली रॉकेट (Charlie Rocket) या युजरनं इंस्टाग्रामवर एक क्लिप शेअर केलीय. ज्यात मुलीसोबतचा त्याचा संवाद दिसत आहे. जेव्हा त्यानं मुलीला तिच्या 'स्वप्न'बद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, मला स्वयंपाक करायला आवडतं. मी आज कुकीज बनवल्या आहेत. ती पुढे म्हणाली, ती तिच्या पायाच्या उपचारासाठी निधी गोळा करत होती, असं तिनं चार्लीला सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: "जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते," लोकसभा लढवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकास भोवलं

द्रविड सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? BCCI नव्या गुरुच्या शोधात

'भारताने पाकिस्तानचा सन्मान करावा, नाहीतर ते अणुबॉम्ब टाकतील'; काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे वाद

Laila Khan Murder Case : १३ वर्षांनंतर मिळाला न्याय ! अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी सावत्र वडिलांना होणार शिक्षा

SCROLL FOR NEXT