What to do with such e-passes; The unfortunate death of an old man for not crossing the border 
देश

अश्या ई-पासचे करायचे तरी काय; सीमा ओलांडून न दिल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळवृत्तसेवा

अनुपपूर (मध्यप्रदेश): कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात गेल्या अनेक दिवसापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशभरात कोरोनामुळे मृत्यू होत असतानाच त्याच्या उपायासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुद्धा अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.अशीच एक अतिशय दुर्दैवी घटना अनुपपूर जिल्यातील सीमा भागात घडली आहे. एका आजारी वृद्धाकडे पास असताना सुद्धा त्याला छत्तीसगडच्या सीमेत प्रवेश करू न दिल्यामुळे त्या वृद्धाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे आता सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यात राहणाऱ्या 78 वर्षीय केशव मिश्रा यांना ह्रदयविकाराच्या आजाराने ग्रासले होते. या आजाराच्या उपचारासाठी त्यांच्या लहान भावाने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी ई-पास बनवून घेतला होता. केशव मिश्रा यांना उपचारासाठी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील अपोलो रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येणार होते. त्यांचे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांना अनुपपूर जिल्ह्यातील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर पोलिसांकडून अडविण्यात आले. छत्तीसगडच्या सीमेवरील अधिकाऱ्यांनी त्यांना सीमा ओलांडता येणार नाही असे सांगितले. 

ह्दयविकाराने ग्रस्त असलेल्या 78 वर्षीय वृद्ध केशव मिश्रा यांनी त्या अधिकाऱ्यांसमोर हात जोडून सीमा ओलांडण्यासाठी विनवणी केली मात्र अधिकाऱयाने त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना सीमा ओलांडून दिली नाही. हि घटना सहन न झाल्यामुळे  78 वर्षीय केशव मिश्रा यांचा जाग्यावरच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सीमेवरील अधिकाऱ्याने माणुसकी न दाखविल्यामुळे केशव मिश्रा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना ते प्रवास करत असलेल्या कारनेच त्यांच्या मूळगावी परत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. सीमेवरील अधिकाऱ्यांच्या हलगर्जी वागणुकीमुळे एका व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे.

मृत मिश्रा यांच्या कुटुंबियांकडून छत्तीसगड पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे. छत्तीसगड पोलिसांनी मिश्रा कुटुंबीयांचे वाहन सीमेवर जाणीवपूर्वक 1 तासापेक्षा जास्त काळासाठी अडवून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सीमाभागातील पोलिसांना वारंवार विनवणी करून त्यांना पास दाखवून सुद्धा त्यांनी हलगर्जीपणाने वागत आडमुठीची भूमिका घेतली. मिश्रा व त्यांच्या कुटुंबियांचे काहीही ऐकून घेतले नाही. यामुळेच मिश्रा याना उपचार मिळाला नाही व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी  त्यांच्या कुटुंबीयांची भावना आहे. 

या घटनेनंतर मिश्रा कुटुंबीयांनी छत्तीसगड सरकारकडे न्यायाची मागणी केली असून मृत मिश्रा यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT