G20 Summit Esakal
देश

G20 Summit: जी-20 परिषद म्हणजे नेमकं काय? कशामुळे महत्त्वाची आहे ही बैठक? जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी ही मोठी संधी

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजधानी दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या जी 20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जगातील ताकदवर देशाचे प्रमुख राजधानी दिल्ली येथे असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या या जी २० समुहाच्या शिखर परिषदेसाठी सर्व तयारी पुर्ण झाली आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर होणाऱ्या या जी २० परिषदेला अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदा जी २० परिषदेचे अध्यक्ष पद भारत भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे जी २० परिषद?

जी-२० सदस्य देशांचा समुह असून हा जागतिक GDP च्या अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या बातीत ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतात. जी-२० देशांच्या परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

जी -20 चे हे समीट शिखर परिषद म्हणून ओळखले जाते. या परिषदेत मुख्य दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जातो.

जी 20 सदस्य देश

अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनाडा, चीन, जर्मनी, फ्रांस, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, रूस, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि यूरोपीय संघचा समावेश आहे.

भारतात परिषदेला कोण कोण येणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक, जापान चे पंतप्रधान फिमियो किशिदो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज, जर्मन चांसलर, फ्रांसचे राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों, दक्षिण अफ्रीका, तुर्की आणि अर्जेंटीनाचे राष्ट्रपती भारतात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT