Vivek Bindra Controversy eSakal
देश

Vivek Bindra Controversy : एका यूट्यूब व्हिडिओमुळे कसं सुरू झालं दोन मोटिव्हेशनल स्पीकर्समधील युद्ध? जाणून घ्या

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा या दोघांमधून सध्या विस्तवही जात नाहीये. या सगळ्याची सुरुवात ही 11 डिसेंबरच्या एका व्हिडिओमुळे झाली.

Sudesh

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra Controversy : सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन वाद निर्माण होत असतात. आरोप-प्रत्यारोप, ट्विट्स अशा बऱ्याच गोष्टींमुळे कितीतरी सेलिब्रिटी चर्चेत येत असतात. सध्या असाच एक वाद दोन सोशल मीडिया मोटिव्हेशनल स्पीकर्समध्ये सुरू आहे. संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा या दोघांमधून सध्या विस्तवही जात नाहीये.

हा वाद कशामुळे सुरू झाला, आणि नेमका कशामुळे वाढला याबाबत बऱ्याच जणांना कुतूहल आहे. लोकांना नेहमी सकारात्मक संदेश देणारे, आणि कोट्यवधी फॉलोवर्स असणारे हे दोघे मोटिव्हेशनल स्पीकर सध्या एकमेकांवर टीका आणि कुरघोडी करताना दिसत आहेत. या सगळ्याची सुरुवात ही 11 डिसेंबरच्या एका व्हिडिओमुळे झाली.

काय आहे प्रकरण?

11 डिसेंबरला संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari Youtube) यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरुन 'Big Scam Exposed' नावाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तीन तरुणांनी आपला अनुभव शेअर केला. एका यूट्यूबरने आपल्याला बिझनेस कोर्स विकण्याच्या नावाखाली कसं फसवलं हे या तरुणांनी सांगितलं होतं.

या तरुणांनी सांगितलं, की बिझनेस कोर्स रद्द करून त्याचे पैसे परत मागितले असता, तशी पॉलिसीच नसल्याचं या यूट्यूबरने म्हटलं. तसंच, पैसे परत हवे असतील तर हेच कोर्स इतरांना विकून त्याच्या कमिशनमधून ते मिळवू शकता, असं या तरुणांना सांगण्यात आलं.

या व्हिडिओमध्ये विवेक बिंद्रा (Vivek Bindra) किंवा त्यांच्या 'बडा बिझनेस' या कंपनीचा कुठेही उल्लेख नव्हता. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर बिंद्रा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले यूट्यूबर तेच असल्याचा अंदाज नेटकरी लावू लागले.

यामुळे बिंद्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरुन (Vivek Bindra Youtube) एक कम्युनिटी पोस्ट करत या व्हिडिओला उत्तर दिलं. "संदीप भाई, मी तुमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला. तुम्ही असं म्हटलं आहे, की हा माझ्या कंपनीबाबत आहे, त्यामुळे मला अधिकृत आयडीच्या माध्यमातून याबाबत बोलणं भाग आहे. जेणेकरून लोकांच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही." असं ते म्हणाले.

"मी तुमच्या शो ला एकदा आलो होतो, आणि प्रामाणिकपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. दर्शकांच्या मनात माझ्याबद्दल काही प्रश्न असतील, तर मी पुन्हा एकदा शोमध्ये येऊन खुली चर्चा करण्यास तयार आहे. मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो. पाहूयात तुमच्यात मला सामोरं जाण्याची हिंमत आहे की नाही." असंही या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

माहेश्वरींचं प्रत्युत्तर

यावर संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) यांनीही प्रत्युत्तर देत एक कम्युनिटी पोस्ट लिहिली. "प्रिय विवेक, मी नुकतीच तुमची कॉल रेकॉर्डिंग ऐकली. एकीकडे तुम्ही माझ्या टीमला कायदेशीर कारवाईची धमकी देत आहात, दुसरीकडे तुम्ही आपले कर्मचारी माझ्या घरी पाठवले. तेही एकदा नाही, तर अनेकदा. तुम्हाला खरंच असं वाटतं का, की मी तुमच्या धमक्यांना घाबरेल? जे चुकीचं काम करतात ते घाबरतात. मी माझ्या नाही तर सगळ्यांच्या फायद्यासाठी काम करतो.. आणि शेवटपर्यंत करत राहील. तुमच्यासारखे लाखो लोकही मिळून मला थांबवू शकणार नाहीत."

माहेश्वरींच्या या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून विवेक यांनी जानेमन बिगेस्ट कॉन्ट्रोव्हर्सी (Biggest Controversy) नावाचा एक व्हिडिओच पोस्ट केला. यानंतर संदीप यांनीही स्टॉप विवेक बिंद्रा नावाचा व्हिडिओ पोस्ट करून त्याला प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमध्ये माहेश्वरी यांनी असंही सांगितलं, की ते स्कॅममध्ये अडकलेल्या मुलांची मदत करण्यासाठी एक लॉ फर्म हायर करणार आहेत. यामध्ये आता पुढे काय होतं हे औत्सुक्याचं ठरणार आहे. (Vivek Bindra Controversy)

विवेक बिंद्रा अडचणीत

या सगळ्या दरम्यान विवेक बिंद्रा यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने FIR दाखल केली आहे. लग्नानंतर दोनच दिवसांनी विवेक यांनी आपल्याला मारहाण केल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. विवेक यांचा पहिल्या पत्नीसोबत देखील वाद सुरू आहे, ज्याची केस कोर्टात सुरू आहे. एकूणच विवेक बिंद्रा हे सध्या सर्व बाजूंनी अडचणीत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT