Diwali Fire Policy  Sakal
देश

Fire Insurance : फायर इन्शुरन्स म्हणजे काय? दिवाळी काळात प्रत्येकाला असावी माहिती

आजपासून दिवाळीचा उत्सवाला सुरूवात झाली असून, या काळात अनेकजण मोठ्या प्रमाणात आतषबाजी करतात.

सकाळ डिजिटल टीम

Fire Insurance In Diwali : आजपासून दिवाळीचा उत्सवाला सुरूवात झाली आहे. या काळात अनेकजण मोठ्या प्रमाणात आतषबाजी करतात. अनेकदा चुकीमुळे एखादी अप्रिय घटना घडते. आज आम्ही तुम्हाला फायर पॉलिसी म्हणजे काय आणि दिवाळी काळात ती का आवश्यक आहे. याबाबत सांगणार आहोत.

आजच्या काळात विम्याचे महत्त्व खूप वाढले आहे. साधारणपणे तुम्ही जीवन विमा, आरोग्य विमा, मोटार वाहन विमा याबद्दल ऐकले असेलच. फायर पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारकाच्या मालमत्तेचे आगीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्या नुकसानाची भरपाई करते. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, दिल्ली अग्निशमन दलाला आगीच्या घटनांशी संबंधित सुमारे 200 कॉल आले.

फायर इन्शुरन्स म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, अग्नि विमा पॉलिसी एखाद्याच्या मालमत्तेचे आगीच्या नुकसानीपासून संरक्षण देते. आगीमुळे उद्भवलेल्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान कव्हर करून, पॉलिसी वस्तूंसह इतर अनेक जोखमींपासून संरक्षण करते. साधारणपणे यामध्ये धूर, उष्णता किंवा यामुळे होणारे नुकसान, आग विझवण्यासाठी वापरलेल्या पाण्यामुळे होणारे नुकसान आदींअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते.

फायर पॉलिसी कोण निवडू शकतो?

बर्‍याचदा, नागरिक फायर पॉलिसीकडे केवळ व्यावसायिक मालमत्तेची पूर्तता करणारी पॉलिसी म्हणून पाहतात. मात्र, आग हा प्रत्येकासाठी समान धोका आहे आणि म्हणूनच आगीच्या धोक्यांपासून मालमत्तेच्या संरक्षणासाठी कोणतीही व्यक्ती, संस्था, फर्म या पॉलिसीची निवड करू शकतो.

फायर इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार

1. विशिष्ट पॉलिसी - या अंतर्गत, विशिष्ट मालमत्तेसाठी विशिष्ट विम्याची रक्कम ठरवली जाते आणि कोणतेही नुकसान झाल्यास, वास्तविक नुकसान निवडलेल्या विमा रकमेपेक्षा जास्त नसते.

2. सर्वसमावेशक पॉलिसी - ही पॉलिसी केवळ आगीशी संबंधित अपघातांसाठीच नसून चोरी, वीज, घरफोडी, दंगल, कीटकांमुळे होणारे नुकसान इत्यादींसह इतर जोखमींपासून संरक्षण देते.

3. फ्लोटिंग पॉलिसी - जर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या चढ-उतार विभागाशी संबंधित काम करत असाल तर, ही पॉलिसी उत्तम आहे. ही पॉलिसी एकाच वेळी एक किंवा अधिक वस्तूंसाठी एक विमा रक्कम आणि एक प्रीमियम अंतर्गत कव्हरेज देते.

4. व्हॅल्यूएबल पॉलिसी - या पॉलिसी अंतर्गत, नुकसान झालेल्या मालमत्तेच्या सध्याच्या बाजारभावाच्या आधारे दाव्याची रक्कम निश्चित केली जाते. क्लेम सेटलमेंटच्या वेळी, विमा कंपनी नुकसान झालेल्या मालमत्तेची किंवा मालमत्तेची पुनर्स्थापना करून त्याचे बदली मूल्य पॉलिसीधारकाला दाव्याची रक्कम म्हणून परत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT