Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi: अदानींच्या गुंतवणुकीत चीनी व्यक्तीची भूमिका काय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

गार्डियन, फायनान्शिअल टाइम्समध्ये आज अदानींच्या गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अदानींकडून भारतातील पायाभूत सुविधांची कंत्राट मिळत आहेत. पण त्यांच्या या व्यवहारात एक चीनी व्यक्ती आहे, या बड्या गुंतवणुकींमध्ये या व्यक्तीची नेमकी भूमिका काय? असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विचारला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सवाल विचारला. (What is role of Chinese in Adani investment Rahul Gandhi question to Narendra Modi govt)

राहुल गांधी म्हणाले, "G20 परिषदा सध्या भारतात होत आहेत, विविध देशांतून दिल्लीत जागतीक नेते दाखल झाले आहेत. आज सकाळी एक खूपच गंभीर प्रकरण समोर आलं आहे यांमध्ये गार्डियन आणि फायनान्शिअल टाइम्स या दोन जागतीक प्रसिद्ध अर्थविषयक वर्तमानपत्रांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत"

१ बिलियन डॉलर्सची रक्कम देशाबाहेर गेली

त्यानुसार, १ बिलियन डॉलर्स अदानींच्या कंपनीच्या नेटकवर्कमधून विविध देशात गेला आणि पुन्हा परत आला. यापैशांच्या माध्यमातून अदानींनी आपल्या शेअरची किंमत वाढवली. याच्या फायद्यातून त्यांनी भारताच्या पायाभूत सुविधा, एअरपोर्ट्स खरेदी केली आहेत. या वर्तमानपत्रांकडे याचे पुरावे आहेत.

पेपर ट्रेल आहेत, ईमेल आहेत, कागदपत्रे आहेत. त्यामुळं हा प्रश्न उपस्थित होतो की, हा जो पैसा वापरला जात आहे तो अदानींचा आहे की इतर कुणाचा? जर तो इतर कोणाचा असेल तर कोणाचा आहे?

चीनी व्यक्तीचा अदानींशी संबंध काय?

याचे मास्टरमाईंड जे आहेत ते गौतम अदानींचे भाऊ विनोद अदानी आहेत. याशिवाय त्यांचे दोन बिझनेस पार्टनर आहेत. यांपैकी एक नासिर अली शबान अली आणि दुसरा चँग चुंग लींग हा चीनी नागरीक आहे.

जर अदानी भारताच्या पायाभूत सुविधा खरेदी करत आहेत तर चा चीनी व्यक्ती त्यांच्यासोबत कसा? या चीनी व्यक्तीची भारतातील गुंतवणुकींमधील भूमिका काय आहे? त्यानं काय केलंय? हे समोर आलं पाहिजे. तसेच हे परदेशी नागरिक भारताच्या शेअर मार्केटशी छेडछाड करत आहेत. याबाबत हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण अदानी देशाच्या डिफेन्समध्ये, पायाभूत सुविधांमध्ये, एअरपोर्ट्समध्ये गुंतवणूक करत आहेत.

G20 परिषदेत खोट सांगितलं जातंय

तिसरा प्रश्न म्हणजे, जी सेबीची चौकशी झाली होती त्यात अदानींना क्लीनचीट मिळाली. याप्रकरणात ज्या व्यक्तीनं त्यांना क्लीनचीट दिली, तो व्यक्ती अदानींच्या एनडीटीव्हीमध्ये संचालक आहे. म्हणजेच हे एक नेटकवर्क आहे यामध्ये एक संस्था ताब्यात घेण्याचा प्रकार सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काही करत का नाहीत? शांत का बसले आहेत? ते अदानींची चौकशी का करत नाहीत? यामुळं भारताची प्रतिमा डागाळली गेली आहे. सध्या जी 20 मध्ये भारत पारदर्शक असल्याचं सांगितलं जात आहे, पण हा काय प्रकार आहे? त्यामुळं पंतप्रधांनी तात्काळ याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमार्फत (जेपीसी) चौकशी जाहीर करायला पाहिजे, अशी मागणीही यावेळी राहुल गांधींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT