After-Lockdown-Life 
देश

कसे असेल लॉकडाउननंतरचे नवे जनजीवन; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

कोरोनाव्हायरसयच्या जागतिक साथीला रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर केला आहे.  आता काही देशांत व्यवहार सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. लॉकडाउनंतरचे नवे जनजीवन पूर्वपदावर येईल, पण ते नवे नियम पाळत, अंतर राखूनच. नवी कार्यव्यवस्थाच यातून उदयाला येऊ शकते.

समूहाने एकत्र येणे टाळणे
काही जण यापुढेही एकांतवासात राहतील. मोठ्या समूहाने एकत्र येणे टाळावे. सुरक्षित अंतर पाळावे (किमान एक मीटर दूर)

काम करताना अंतर ठेवणे
कार्यालयात कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवावे. ज्यांना शक्य आहे, त्यांना घरुन काम करण्यास सांगितले जाईल. भविष्यात टेली/ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अत्यावश्‍यक ठरतील.

तोंडावर मास्क लावणे
अनेक देशांमध्ये सार्वजिक ठिकाणी जाताना मास्क लावण्याची शिफारस केली जाईल. हातमोजे घालणे ही सामान्य बाब ठरेल.

प्रवास व वाहतूक
अपवादात्मक कारणांसाठीच आंतरराष्ट्रीय/ लांब पल्ल्यांचे प्रवास केले जातील. पायी जाणे, सार्वजनिक वाहनांऐवजी दुचाकी, स्वतःची मोटार यांचा वापर करतील.

स्वच्छता पाळणे
घरी किंवा कामावर असताना पाण्याने वारंवार हात धुतले जातील. सॅनिटारझरचा वापर नियमित केला जाईल. चेहऱ्याला स्पर्श करण्याची सूचना लक्षात ठेवावी लागेल.

ऑनलाइन व्यवहार वाढतील
अनेक हॉटेल, दुकाने यांचा दूरस्थ व्यवहारावर भर असेल. ऑनलाइन साहित्य, खाद्यपदार्थ घरपोच दिले जातील. यासाठी ई -व्यवहार, ॲप, व्हिडिओ सेवा यांचा वापर वाढेल. 

प्रतिकार शक्ती वाढविणे
शरीरातील प्रतिकाशक्ती वाढविण्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी आरोग्यपूर्ण आहार, नियमित व्यायाम आणि विश्रांती याला प्राधान्य दिले जाईल. 

दूरस्थ शिक्षण
अनेक शाळा ऑनलाइन वर्ग घेतील. पण ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा अन्य डिजिटल उपकरणे नाहीत त्यांच्यासाठी ते अडचणीचे ठरेल. ‘घरातून शिक्षण’ ही संकल्पना जोर धरेल.

ई- खेळ आणि रिकामी मैदाने
अनेक क्रीडा स्पर्धा रद्द होतील, पुढे ढकलल्या जातील किंवा नव्या स्वरुपात खेळविल्या जातील. ई- खेळ, ‘व्हिडोओ ऑन डिमांड’, ‘इनडोअर’ खेळ लोकप्रिय होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

Maharashtra School Inspection : राज्यातील साडेपाच हजार शाळांची होणार तपासणी; १५ दिवस फिरणार पथकं; कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश

Inscription in Junnar : जुन्नरमध्ये यादवकालीन शिलालेख उजेडात; राजा सिंघणदेव द्वितीय याने कसण्यासाठी जमीन दान केल्याचा उल्लेख

Video: अभिनेत्रीने मारली चक्क 40 फूट खोल विहिरीत उडी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'त्ये कसाय माहित्ये का..?'

SCROLL FOR NEXT