Narendra-Modi 
देश

नरेंद्र मोदींची काय चर्चा होणार आज अर्थतज्ज्ञांशी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. ९) देशभरातील प्रमुख अर्थतज्ज्ञांशी चर्चा करतील. निती आयोगात होणाऱ्या संवाद बैठकीत आर्थिक सुधारणांबाबतच्या तज्ज्ञांच्या सूचना जाणून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

ढासळती अर्थव्यवस्था सावरण्याची चिंता सरकारपुढे आहे. अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे तेलाचे दर कडाडल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. याशिवाय, २०१९-२० या आर्थिक वर्षातील विकासदर आधीच्या वर्षातील ६.८ टक्‍क्‍यांच्या तुलनेत पाच टक्‍क्‍यांवर येण्याच्या शक्‍यतेने सरकारची तारांबळ उडाली असून, उपाययोजनांसाठी आता धावपळ सुरू झाली आहे.

सरकारच्या धोरणांबद्दल उद्योग क्षेत्राला वाटणारा संशय आणि या क्षेत्राचा निरुत्साह दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सोमवारी (ता. ६) उद्योजकांशी चर्चा केली होती. उद्योजकांच्या गुंतवणुकीच्या योजना जाणून घेताना उद्योग विस्तारासाठी हवे ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. तेल, ऊर्जा तसेच पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, नव्या गुंतवणुकीसोबत वेगवेगळ्या भागांत उद्योगाचा विस्तार करण्याचे आवाहनही मोदींनी केले होते. याच प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारने आज कोळसा खाणींच्या नियंत्रित उपयोगाच्या निकषात सुधारणा करण्यासाठी कायदाबदलाची घोषणा केली. शिवाय, तातडीच्या अंमलबजावणीसाठी वटहुकमाद्वारे उद्योग क्षेत्राला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणून आता अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT