Whats Wrong With India Trend Explained viral trend netizens Post photo Videos Flaws In Other Countries marathi news rak94  Esakal
देश

What's Wrong With India? Trend : वॉट्स राँग विथ इंडिया? सोशल मीडियावरील हा ट्रेंड नेमका आहे काय?

Whats Wrong With India Trend : सध्या भारत आणि परदेशातील इंटरनेट यूजर्समध्ये लढाई सुरू असून नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

रोहित कणसे

Whats Wrong With India Trend : सोशल मीडियावर सतत काहीतरी ट्रेंड होताना पाहायला मिळतं. सध्या इंटरनेटवर दोन गटांमध्ये व्हर्चुअल फाइट पाहायला मिळतेय. भारत आणि परदेशातील इंटरनेट यूजर्समध्ये ही लढाई सुरू असून नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

मीडिया रिपोर्टनुसार हा प्रकार सुरू झाला १३ दिवसांपूर्वी, जेव्हा झारखंडमधील दुमका येथे स्पेनच्या एका महिला पर्यचकावर समुहिक आत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेतील आरोपींविरोधात पोलींसांनी कारवाई केली आणि तीन आरोपींना अटक देखील करण्यात आली. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर काही परदेशी हँडल्सनी या मुद्द्यावरून एक ट्रेंड सुरु केला. परदेशातील एक्स वापरकर्त्यांनी सोळ मीडियावर 'What's Wrong with India?' ट्रेंड करालाय सुरूवात केली. मंगळवारी संध्याकाळी (१२ मार्च) पर्यंत हा कीवर्ड मेंशन करत २.५ लाखाहून अधिक पोस्ट करण्यात आल्या.

भारताविरोधात सुरु असलेल्या या ट्रेंडविरोधात भारतीय सोशल मीडिया यूजर्स देखील मैदानात उतरले असून विदेशी यूजर्सना अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशातील लोकांना तशाच पोस्ट करत उत्तर दिलं जात आहे. तसेच वापरकर्त्यांकडून एक्सचे मालक इलॉन मस्क यांत्यावर जाणीवपूर्वक हा ट्रेंड चालवल्याचा आरोप देखील करत आहेत.

इतेकच नाही तर अनेक भारतीयांनी 'What's Wrong with India?' लिहून दुसऱ्या देशाचे फोटो शेअर केल्यानंतर देखील त्या पोस्ट्सना भरपूर रीच मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या ट्रेंडला एक्सचा अल्गोरिदम जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

MyGovtIndia ने देखील ट्विटर अकाउंटवरून देखील 'What's Wrong with India?' या कीवर्डसह पोस्ट केल्याने हा मुद्दा चर्चेत आला. या पोस्टमध्ये भारताच्या प्रगतीबद्दल माहिती देणारे फोटो शेअर करण्यात आले होते. ही पोस्ट देखील लाखो लोकांनी पहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT