whatsapp india europe 
देश

धक्कादायक! व्हॉटसअ‌ॅपचा भारताशी दुजाभाव; युरोपात पॉलिसी वेगळी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - व्हॉटसअ‌ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉटसअ‌ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवर सुनावणीवेळी सांगितलं की, फोनमध्ये व्हॉटसअ‌ॅप डाउनलोड करणं बंधनकारक नाही. तुमच्या इच्छेनुसार ते डाउनलोड करायचं की नाही हे ठरवू शकता. 

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीवेळी केंद्र सरकारने सांगितलं की, भारतीय युजर्ससाठी व्हॉटसअ‌ॅपने त्यांच्या पॉलिसीत एकतर्फी बदल केला आहे. व्हॉटसअ‌ॅप भारतीय युजर्सना एक आणि युरोपिय युजर्ससाठी एक पॉलिसी देत असून हे चिंताजनक आहे असंही केंद्राने सांगितलं.

याआधी दिल्ली न्यायालयाने व्हॉटसअ‌ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं होतं की, जर तुमचं खासगी आयुष्य धोक्यात य़ेतंय असं वाटत असेल तर अ‌ॅप डिलिट करा.  न्यायालयाने म्हटलं होतं की, तुम्ही मॅप किंवा ब्राउझर वापरत असाल वापरता का? त्यातही तुमचा डेटा शेअर केला जातो.

याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटलं होतं की, व्हॉटसअ‌ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सरकारने कारवाई केली पाहिजे. व्हॉटसअ‌ॅपसारखे प्रायव्हेट अ‌ॅप सर्वसामान्यांची माहिती शेअर करते त्यावर बंधनं घालण्याची गरज आहे. यावर दिल्ली न्यायालयाने कठोर मत व्यक्त केलं होतं. 

प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्याच्या विरोधात एका वकिलाने दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात म्हटलं की, संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या विरोधात हे आहे. यासाठी कडक कायदा तयार करावा अशी मागणी करण्या आली होती. युरोपिय देशांमध्ये यासाठी कडक कायदे आहेत. त्यामुळे व्हॉटसअ‌ॅपची पॉलिसी तिथे वेगळी आहे. भारतात कायदा कठोर नसल्यानं सर्वसामान्यांचा डेटा थर्ट पार्टीला शेअर केला जातो असं याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT