WhatsApp Video Call esakal
देश

WhatsApp Video Call : व्हीडिओ कॉलवर 'ती' कपडे काढत होती, बघताच न्यायाधीशांचा मुलगा बेशुद्ध पडला

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Video Call News : व्हॉट्सअप मेसेजिंग App सध्या सर्वांच्याच गरजेचं बनलेलं आहे. व्हॉट्सअपने जेव्हापासून व्हीडिओ कॉलची सुविधा दिलीय तेव्हापासून तर जग आणखीनच जवळ आलंय.

तरुण-तरुणींमध्ये व्हॉट्सअप व्हीडिओ कॉलची क्रेझ असते. परंतु काही लोक याचा गैरवापर देखील करतात. लोकांना फसवण्यासाठी व्हाट्सअप व्हीडिओ कॉलचा सर्सास वापर होतांना दिसून येत आहे.

अशीच एक घटना घडलीय. ज्यामध्ये एक तरुणी व्हीडिओ कॉलवर तरुणासमोर कपडे काढत होती. मात्र तरुणाने समोर जे बघितलं त्यामुळे तो चक्क बेशुद्ध पडला. या घटनेची सध्या चवीने चर्चा केली जात आहे.

गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. एका पीडित तरुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी एक कुभांड रचण्यात आलेलं होतं. सेशन कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या २५ वर्षाच्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडला.

सुरुवातीला व्हॉट्सअपवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला. पीडित तरुणाने फोन उचलताच समोरुन एक तरुणी स्वतःचे कपडे काढत होती. हे बघताच तो तरुण बेशुद्ध होऊन पडला. हा सगळा प्रकार त्याच्या वडिलांसमोर घडला.

तरुणाच्या वडिलांना पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, 'जेव्हा माझ्या मुलाने व्हीडिओ कॉल उचलला तेव्हा मी तिथेच होतो. स्क्रीनवर एक मुलगी होती आणि ती कपडे काढू लागली. माझ्या मुलाने हे बघितलं आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्या तरुणीने ते फोटो त्याला पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करु लागली.' याप्रकरणी आता गुरुग्राम पोलिस कसून तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणार

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT