Muslim Family
Muslim Family esakal
देश

भाजपला मतदान करणं मुस्लिम कुटुंबाला पडलं महागात; अन्न-पाण्यावर बंदी

सकाळ डिजिटल टीम

रेरिया गावात भाजपला मतदान करणं एका मुस्लिम कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध भागातून भाजपला (BJP) मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या थांबताना नाव घेत नाहीयत. बाराबंकी जिल्ह्यातून (Barabanki District) असंच एक प्रकरण समोर आलंय. इथल्या एका मुस्लिम कुटुंबानं (Muslim Family) आरोप केलाय की, त्यांनी यूपी विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) भाजपच्या बाजूनं मतदान केलं होतं, त्यामुळं गावकऱ्यांनी त्यांचं रेशन आणि पाणी बंद केलंय. गावानं या कुटुंबाला मशिदीत नमाज अदा करण्यासही बंदी घातल्याचा आरोप मुस्लिम कुटुंबानं केलाय.

फतेहपूर (Fatehpur) कोतवाली परिसरातील रेरिया गावात भाजपला मतदान करणं एका मुस्लिम कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय. गावप्रमुखासह गावातील सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी या कुटुंबाचं रेशन आणि पाणी बंद केलंय. शिवाय, कुटुंबाला गावातील मशिदीत नमाज अदा करण्यापासून आणि त्यांच्या दुकानातून सामान नेण्यापासून रोखण्यात आलंय. अशा परिस्थितीत गावकऱ्यांच्या या अत्याचारामुळं हे कुटुंब प्रचंड अस्वस्थ झालंय. कुटुंबात या महिन्याच्या 31 तारखेला मुलाचं लग्न आहे. त्यांचा मुलगा सौदी अरेबियातून (Saudi Arabia) नुकताच घरी आलाय. मात्र, आता गावप्रमुखासह गावातील लोकांनी मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू नये, लग्नासाठी गावात मंडप घालू नये, असा आदेश काढलाय.

पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, गावातील प्रमुखासह काही लोक त्यांची एक जमीन मदरशाला देण्यासाठी दबाव आणत आहेत. जर गावातील कोणी त्यांच्या कुटुंबीयांशी बोलले, लग्नात जेवण केलं तर त्यांना 20 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. यासोबतच लग्नात मंडप लावणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्यांसह इतर लोकांनाही समज देण्यात आलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: तीन दिवसांनी मतदान अन् शेकडो मतदान कार्ड कचऱ्यात! जालन्यातील धक्कादायक प्रकार

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

एमआयडीसी मध्ये जागा बघितली होती पण... दाभोलकर खुनाप्रकरणी जन्मठेप झालेल्या शरदच्या घरी शोकाकुल वातावरण

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरसह कागल परिसरात जोरदार पाऊस सुरु

OTT Release This Weekend: 'अनदेखी 3', मर्डर इन माहिम अन् आवेशम; वीकेंडला घरबसल्या पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

SCROLL FOR NEXT