When politics Maharashtra in trouble leaders raise border issue of Karnataka Basavaraj Bommai sakal
देश

महाराष्ट्रातील राजकारण अडचणीत येते तेव्हा कर्नाटकाचा सीमाप्रश्न नेते उचलून धरतात-बसवराज बोम्मई

राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी हे प्रकरण पेटविले जाते, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यावर केली आहे

विनायक जाधव

बंगळूर : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न हा संपलेला विषय असल्याचे म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील राजकारण ज्यावेळी अडचणीत येते. तेव्हा कर्नाटकाचा सीमाप्रश्न महाराष्ट्रातील नेते उचलून धरतात. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी हे प्रकरण पेटविले जाते, अशी टीका महाराष्ट्रातील नेत्यावर केली आहे. विधानसभेत झालेल्या समाज कल्याण खात्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, सीमाप्रश्नाबाबत यापूर्वीच निर्णय झाला आहे.

कर्नाटकाची एक इंचही जमीन दिली जाणार नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि नेते आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी भाषा आणि सीमाप्रश्न सारखा विषय उचलून धरण्यापर्यंत खालच्या पातळीवर उतरतात. हा प्रकार त्यांनी सोडून दिला पाहिजेत. कर्नाटक बहुभाषिक असलेले अनेक प्रदेश महाराष्ट्रात गेले आहेत. तो भाग पुन्हा कर्नाटकाला कसा परत मिळेल, याबाबत आम्ही देखील विचार करीत आहोत, असे म्हणत कर्नाटकातून सीमा प्रश्नासाठी होणाऱ्या कोल्हेकुईला खतपाणी घातले.

दरम्यान पोलिस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या गैरव्यवहाराबाबत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. याप्रकरणी गुलबर्गा येथील भाजप नेत्यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे तर काँग्रेस आमदार प्रियांका खडके यांनी देखील याप्रकरणी सत्तेवरील लेखा प्रभावी मंत्राचा हात असल्याचा आरोप केला आहे मात्र या आरोपावर त्याने भाष्य करणे टाळले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच ते तडक निघून गेले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आंदोलनाला महाराष्ट्राचा नेहमीच पाठिंबा राहील, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर टीका करताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी, महाराष्ट्र सरकार ज्यावेळी अडचणीत आली आहे. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच उकरून काढला असल्याचा जावईशोध लावला. सीमाप्रश्न विषयात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. महाराष्ट्राला देखील ते ठाऊक आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडे आमची अशी मागणी आहे की, त्यांनी भाषा आणि सीमाप्रश्नाचा विषय आपल्या राजकीय उद्देशासाठी करणे सोडून द्यावे. कर्नाटकाची एक इंचही जमीन देण्याचा प्रश्नच याठिकाणी उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री बोम्माई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT