देश

'जेव्हा बलात्कार टाळता येत नाही तेव्हा झोपून मजा घ्या', काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेचे माजी स्पीकर आणि वरिष्ठ काँग्रेस नेते के आर रमेश कुमार (Former Karnataka Assembly Speaker) यांनी एक वादग्रस्त विधान विधानसभेमध्ये केलंय. 'जेंव्हा बलात्कार टाळता येण्याजोगा नसतो, तेंव्हा झोपा आणि त्याची मजा घ्या' असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलंय. विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदारांनी सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी (Speaker Vishweshwara Hegde Kageri )) यांच्याकडे वेळ मागितली असतानाच काँग्रेस नेत्याने हे धक्कादायक वक्तव्य केलंय.

स्पीकरच्या खुर्चीवर बसलेल्या विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी प्रत्येकाला वेळ दिल्यास अधिवेशन कसं चालवायचं असा प्रश्न केला. सदस्यांनी स्वतःहून निर्णय घ्या असं सांगून त्यांनी माजी सभापती केआर रमेश कुमार यांच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले की, "मला वाटतं की आपण परिस्थितीचा आनंद घेऊ या, मी हे नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि योग्य कारवाईप्रमाणे पुढे जाऊ शकत नाही."

त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीला विरोध करण्याऐवजी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील सदस्यांमध्ये हशा पिकला. विशेष बाब म्हणजे केआर रमेश कुमार यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष असताना कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा आणि इतर वरिष्ठ नेत्यांमधील वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचे नाव समोर आलं होतं. ज्यात त्यांनी पक्षाकडून 50 कोटी रुपयांची लाच कशी घेतली याचा उल्लेख स्वत: केला आहे.

कोर्टात उलटतपासणी घेतल्यावर जसा बलात्कार पीडितेवर पुन्हा पुन्हा बलात्कार होत असल्याचा असंवेदनशील विनोद करत ते म्हणाले होते की, "मला बलात्कार पीडितेसारखे वाटतं." नंतर जेव्हा महिला आमदारांनी या असंवेदनशील विधानाचा निषेध केला होता, तेव्हा कुमार यांनी माफी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस! ISRO ची मोठी मोहीम, भारताचं स्वतःचं GPS होणार शक्तिशाली, NVS-03 उपग्रह का आहे खास?

Mumbai Indians New Captain? पोलार्डने जुन्या भिडूंना एकत्र आणले! आता रोहित शर्माला कॅप्टन बनवण्याची तयारी, पण एक अडचण...

Meenakshi Shinde: मीनाक्षी शिंदेंमुळे पक्षाची बदनामी, शिवसैनिकांचा संताप; अनेक नगरसेवकांची शक्तिप्रदर्शनाला दांडी

सारा अली खानने घेतलं केदारनाथ मंदिरात दर्शन, मौलाना संतापले, म्हणाले...“तिने हराम गोष्टी केल्या…”

Marathi News Live Updates : पुण्यात नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

SCROLL FOR NEXT