देश

भर मांडवात नववधूचा मृत्यू; नवरदेवाने मेहुणीसोबतच थाटला संसार

लग्नसोहळा सुरु असतांना मृत मुलीचा मृतदेह घरातच ठेवण्यात आला होता.

शर्वरी जोशी

आपल्या कुटुंबाच्या मान-सन्मानासाठी मुली कायमच त्यांच्या स्वप्नांचा त्याग करत असतात. यात कुटुंबियांसाठी अनेक मुलींनी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याच्या घटनाही आपल्या कानावर पडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील इटावा येथे घडला आहे. भर मांडवात नववधूचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या बहिणीला ऐनवेळी लग्नासाठी उभं रहावं लागलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. (when-the-sick-sisters-dies-brides-sister-marries-the-groom-in-etawah)

सोशल मीडियावर चर्चेत आलेली घटना भरथना येथील समसपुरमध्ये घडली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका नववधूचा भर मांडवात मृत्यू झाला. त्यामुळे तिच्याऐवजी कुटुंबियांनी तिच्या बहिणीचं लग्न नवरदेवासोबत लावून दिलं. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा सुरु असतांनी मृत मुलगी सुरभी हिचा मृतदेह घरातच ठेवण्यात आला होता. हा लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर सुरभीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरभी आणि मंजेशकुमार यांचा लग्नसोहळा सुरु असताना अचानकपणे सुरभी जमिनीवर कोसळली. त्यामुळे कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावलं. परंतु, डॉक्टरांनी सुरभीला मृत घोषित केलं होतं. विशेष म्हणजे दारात वरात उभी असतांना वधूशिवाय वरात परत कशी पाठवायची या विचाराने सुरभीच्या कुटुंबियांनी तिच्याऐवजी तिच्या बहिणीचं लग्न मंजेशकुमारसोबत लावून दिलं.

"घडलेल्या प्रकारामुळे नेमकं काय करावं हे कोणालाच सुचत नव्हतं. त्यामुळे आम्ही दोन्ही कुटुंबीय एकत्र बसलो आणि या मुद्द्यावर चर्चा केली. त्यावेळी कोणीतरी आमच्या धाकट्या बहिणीचं निशाचं मंजेशकुमारसोबत लग्न लावण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून हा निर्णय घेतला व निशाचं लग्न लावलं", असं मृत सुरभीचा भाऊ सौरभ याने सांगितलं.

"आमच्यावर असा प्रसंग कधीच ओढावला नव्हता. एक मुलगी मृतावस्थेत घरात होती. तर, दुसऱ्या मुलीचं लग्न लागत होतं. सुख आणि दु:ख एकाच वेळी आम्ही उपभोगत होतो. हा काळ आमच्यासाठी फार कठीण होता", असं सुरभीच्या काकांनी सांगितलं.

दरम्यान, निशा आणि मंजेशकुमार यांचं लग्न होईपर्यंत सुरभीचा मृतदेह घरातच ठेवण्यात आला होता. हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर सुरभीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: स्थानिक निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा; आरक्षण मर्यादेवरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

आजचे राशिभविष्य - 30 ऑक्टोबर 2026

Cheesy Tomato Eggs: टोमॅटो, अंडी आणि चीझचा भन्नाट कॉम्बो! नाश्त्यासाठी ट्राय करा झटपट एग्ज टोस्ट

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 ऑक्टोबर 2026

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या मुख्य अभियंत्याला अटक; ठेकेदाराकडे १९ हजारांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT