Congress Leader DK Shivkumar esakal
देश

DK Shivkumar : 'आम्ही सत्तेत आल्यावर...', कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांचा थेट डीजीपींना इशारा

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू - कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांना अटक करण्याची मागणी केली आहे. डीजीपी सत्ताधारी भाजप सरकारचा बचाव करत आहेत आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि त्यांना अटक झाली पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना हटवावे, असंही शिवकुमार यांनी म्हटलं.

सूद यांच्या सेवेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. किती दिवस ठेवायचे आणि त्यांची पूजा करायची आहे? ते फक्त काँग्रेसवर गुन्हे दाखल करत आहेत. त्यांनी आमच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल केल्याचा दावा शिवकुमार यांनी केला.

दरम्यान आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असही कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले. मे २०२३ पूर्वी २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे.

२२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमताने सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने किमान १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जेडीएसने ९३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी भाजप आणि काँग्रेसने अद्याप आपली यादी जाहीर केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT