Uttarkashi Tunnel Rescue Esakal
देश

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका कधी? आधी यंत्र तुटले, आता हवामानाचा फटका..

मॅन्युअल ड्रिलिंग दरम्यान हवामान बनू शकते आव्हान, मॅन्युअल ड्रिलिंग सुरू किती खोदकाम राहिले बाकी?

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 41 मजूर अडकल्याचा आज 17 वा दिवस आहे, परंतु अद्याप आशेचा किरण दिसत नाही. त्यांना लवकरच सुखरूप बाहेर काढण्यात येईल, असे अधिकारी सातत्याने सांगत आहेत. मात्र बचाव करताना एकामागून एक समस्या येत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी ड्रिलिंगसाठी आणलेले अमेरिकन मशीन बिघडले आणि आता खराब हवामान नवीन संकटाचे संकेत देत आहे. आता बोगद्याच्यावरून मॅन्युअल ड्रिलिंग केले जात आहे.

उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे बचावादरम्यान नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. येत्या २४ तासांत राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचण येऊ शकते, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

कुठपर्यंत पोहोचले काम

मायक्रो टनेलिंग तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी सांगितले की, काल रात्री हे काम खूप चांगले झाले. आम्ही 50 मीटर पार केले. आता जवळपास ५० ते ६० मीटर जाणे बाकी आहे. काल रात्री आमच्यापुढे कोणतेही अडथळे नव्हते.

2 मीटर मॅन्युअल ड्रिलिंगचे काम पूर्ण

आज सकाळपासूनची सिल्क्यारा बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंग चालू आहे आणि पाईप्स ढकलण्यासाठी ऑगर मशीनचा वापर केला जात आहे. आतापर्यंत मॅन्युअल ड्रिलिंगचे सुमारे ३०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा आज १७ वा दिवस

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा आज १७ वा दिवस आहे. आता मॅन्युअल आणि व्हर्टिकल ड्रिलिंग केले जात आहे. मात्र, हवामान हे मोठे आव्हान बनत आहे. IMD ने पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत निसर्गाचे आव्हान असूनही, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सरकार खंबीरपणे उभे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT