राहुल गांधी 
देश

दुसरी लाट काँग्रेसशासित राज्यांतूनच आली; भाजपचा आरोप

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची सुरवातच महाराष्ट्र, छत्तीसगडसारख्या काँग्रेसशासित राज्यांतून झाली आणि हीच राज्ये लाट पसरण्यास जबाबदार आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या टिकेला प्रत्त्युतर दिलं आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची सुरवातच काँग्रेसशासित राज्यातून झाली. लसीकरणातही काँग्रेसशासित राज्यांमध्येच प्रचंड गोंधळ चालू आहे. भारतात जेव्हा काही चांगले होते, देशाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळते तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फार चीड येते व साऱ्या योजनेवरच ते प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतात, असेही संबित पात्रा यांनी म्हटले.

राहुल गांधी म्हणजे मानसिकदृष्ट्या पूर्ण गोंधळलेले व्यक्तिमत्त्व आहे, असा आरोप करून संबीत पात्रा म्हणाले, की लसीकरणाचे विकेंद्रीकरण करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी आता केली आहे. हेच राहुल गांधी यापूर्वी बरोबर उलटी मागणी करत होते. कालच्या योगदिनाच्या निमित्ताने भारतात एका दिवसात ८७ लाख लोकांचे लसीकरण झाले व हा विश्‍वविक्रम झाला. कोरोनाची लढाई जेव्हा जेव्हा निर्णायक वळणावर असते व देशाला काही यश मिळते तेव्हा राहुल गांधी राजकारण सुरू करतात. स्वतःला कोरोना झाल्याचेही त्यांनी राजकारण केले, हे दुर्दैवी असल्याचेही पात्रा म्हणाले.

पात्रा यांनी सांगितले, की राहुल गांधी यांनी आता आभासी पत्रकार परिषदा थांबवून स्वतः लोकांमध्ये फिरावे व काँग्रेसशासित राज्यांत जाऊन कोरोना गैरव्यवस्थापन स्वतः पाहावे. काँग्रेस शासित राज्यांतूनच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, याच राज्यांत सर्वाधिक मृत्यू झाले, याच राज्यांत लसीकरणात हाहा:कार उडाला आहे, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगडसारख्या राज्यांत लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. राजस्थानसारख्या काँग्रेसशासित राज्यानेच केंद्राने दिलेल्या लसी परत पाठविल्याकडे गांधी यांनी आधी लक्ष द्यावे व मग तिसऱ्या लाटेचा इशारा द्यावा व लसीकरणावरून केंद्रावर टीका करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT