PM Modi 
देश

PM Modi: विकासकामांसाठी मोदी इतके पैसे आणतात कुठून? पंतप्रधानांनी स्वतःच सांगितली 'मन की बात'

एका सभेत बोलताना मोदींनी याचं सविस्तर उत्तर दिलं

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांसाठी इतके पैसे आणतात कुठून? असे प्रश्न नेहमी विचारले जातात. त्यावर आज मी उत्तर देणार आहे, असं सांगत खुद्द पंतप्रधान मोदींनी याबाबत माहिती दिली आहे. विकासकामांसाठी पैसा आपल्याकडं खूप आहे, पण त्याचा वापर काँग्रेसनं कधी केला नाही जो भाजपनं केला, असं मोदींनी म्हटलं आहे. (where does Modi get so much money for development works PM himself said Mann Ki Baat)

एका सभेत बोलताना मोदी म्हणाले, "आजकल अनेक जण विचारतात की देशात विकासाचे जी मोठंमोठी काम होत आहेत. त्यासाठी मोदी इतके पैसे आणतात कुठून? चारही दिशांना विकासकामं सुरु असताना मोदी इतके पैसे आणतात कुठून? मी सांगतो मोदी पैसे कुठून आणतात. पहिल्यांदा पैसे कुठे जात होते आणि आज कुठे जातात हे देखील सांगणार आहे" (Latest Marathi News)

आपल्या देशात विकासकामांसाठी पैशांची कमी कधीही नव्हती. हे खूपच महत्वाचं असतं की जो पैसा सरकार पाठवेल तो पुर्णपणे विकासकामात लागायला हवा. पण काँग्रेसनं आपल्या शासन काळात देशाचं रक्त शोषणारी अशी भ्रष्ट व्यवस्था बनवली होती जी देशाच्या विकासाला खात होती" (PM Modi latest News)

काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांनी जाहीररित्या मान्य केलं होतं की, जर काँग्रेस सरकारनं १ रुपया पाठवला तर त्यातील १०० पैशांपैकी ८५ पैशांचा भ्रष्टाचार होत होता. काँग्रेस प्रत्येक योजनेत ८५ टक्के कमिशन खाणारा पक्ष आहे. भाजप सरकारनं गेल्या ९ वर्षात इतका विकास केला आहे तो यामुळं संभव झाला की, भाजपनं काँग्रेसची लुटणारे मार्गच बंद केले. गेल्या ९ वर्षात भाजप सरकारनं आधुनिक हायवे आणि रेल्वेवर २४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT