Rajya Sabha Election 2022 esakal
देश

4 राज्ये, 16 जागा; राज्यसभा निवडणुकीत कोणी मारली बाजी? जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ डिजिटल टीम

चार राज्यांतील एकूण 16 जागांसाठी निवडणूक पार पडली असून या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 16 जागांसाठी (Rajya Sabha Election 2022) शुक्रवारी मतदान झालं. मतमोजणीनंतर कर्नाटकात भाजपला तीन तर काँग्रेसला (Congress) एक जागा मिळाली. राजस्थानात काँग्रेसला तीन तर भाजपला (BJP) एक जागा मिळालीय. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजप-जेजेपी समर्थित उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकलीय. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेनेच्या (Shiv Sena) संजय पवारांचा निवडणुकीत पराभव झालाय.

Maharashtra Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मतं, अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आहेत. आमचा तिसरा उमेदवारही शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडणून आलाय. आज भाजपची ताकद बघायला मिळाली." दरम्यान, काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी म्हणाले, "शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मी विजयी झालोय. मी सर्व आमदारांचं आभार मानतो. परंतु, महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार विजयी होऊ शकले नाहीत याचं आम्हाला दुःख आहे."

कर्नाटकात भाजपच किंग

Karnataka Rajya Sabha Election : कर्नाटकात झालेल्या राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आलाय. भाजपच्या वतीनं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या निवडणूक लढवत होत्या, त्यांना पहिल्या पसंतीची 46 मतं मिळाली. तर काँग्रेसचे जयराम रमेशही निवडून आले आहेत.

4 पैकी 3 ठिकाणी भाजपची बाजी, एका जागेवर काँग्रेस

कर्नाटकातील विजयी उमेदवार

निर्मला सीतारमण - भाजप 46 मतं

जग्गेश- भाजप 46 मतं

लहर सिंह सिरोया- भाजप 33 मतं

जयराम रमेश- काँग्रेस 46 मतं

क्रॉस वोटिंगमुळं जेडीएसचं नुकसान

राजस्थानमध्ये काँग्रेसच सरस, 4 पैकी 3 जागा जिंकल्या

Rajasthan Rajya Sabha Election : राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनं 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिलाय. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळालाय. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.

कोणाला किती मतं मिळाली?

रणदीप सुरजेवाला यांना 43 मतं मिळाली.

मुकुल वासनिक यांना 42 मतं मिळाली.

घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.

प्रमोद तिवारी यांना 41 मतं मिळाली.

डॉ. सुभाष चंद्रा यांना 30 मतं मिळाली.

हरियाणात कोण जिंकले?

Haryana Rajya Sabha Election : हरियाणात भाजपचे कृष्ण पाल पंवार आणि भाजप-जेजेपी समर्थित कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकलीय. दुसऱ्या जागेसाठी पुन्हा मतमोजणी करून कार्तिकेय विजयी झाले. तर, काँग्रेसच्या अजय माकन यांचा फेरमतमोजणीत पराभव झालाय. त्यांचं एक मत फेरमोजणीत रद्द झालंय. हरियाणातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी झाली. काँग्रेसच्या किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांनी मतांबाबत निवडणूक आयोगाकडं तक्रारी पाठवली होती.

2 पैकी 1-1, भाजप आणि काँग्रेस

भाजप - कृष्ण पाल पंवार- 31

अपक्ष - कार्तिकेय शर्मा -

काँग्रेस - अजय माकन- पराभूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT