H D DeveGowda  sakal
देश

काँग्रेस पक्ष अहंकारी असल्याची टीका करतानाच ‘मोदी-३’ सरकारला पुढील पाच वर्षे पाठिंबा - एच. डी. देवेगौडा

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष म्हणून मोदी सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या सर्वांगीण विकासाच्या भूमिकेनुसार धर्मनिरपेक्ष जनता दल काम करेल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष अहंकारी असल्याची टीका करतानाच ‘मोदी-३’ सरकारला पुढील पाच वर्षे समर्थन देऊ, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धर्मनिरपेक्ष जनता दलाचा समावेश केल्याबद्दल देवेगौडा यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शपथविधीच्या कार्यक्रमास हजर राहू शकत नाही, असेही देवेगौडा यांनी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘‘केंद्रात सरकार स्थापन करीत असल्याबद्दल आपले अभिनंदन. देवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली आहे,’’ असे सांगून देवेगौडा पत्रात म्हणतात की, ‘‘मागील दशकभरात ज्याप्रमाणे तुम्ही देशाची सेवा केली, त्याप्रमाणे आगामी काळातही देशसेवा कराल. आजचा क्षण हा ऐतिहासिक आहे.

काँग्रेस पक्ष आपल्या कामगिरीत सुधारणा झाल्याचा दावा करीत आहे. कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत काँग्रेस तडफडत आहे तर अन्य काही राज्यांत पक्षाला जे काही यश मिळाले आहे ते त्यांच्या सहयोगी पक्षांमुळे. सहयोगी पक्षांसोबतची त्यांची आघाडी किती दिवस राहील, हाही प्रश्न आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष म्हणून मोदी सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या सर्वांगीण विकासाच्या भूमिकेनुसार धर्मनिरपेक्ष जनता दल काम करेल.

- एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT