देश

Ram Mandir: पंतप्रधान मोदींनी स्वत: घरी जाऊन प्रतिष्ठापणेचं निमंत्रण दिलेले निषाद कोण आहेत?

देशात सर्वत्र 'राममय' वातावरण तयार झालं आहे. अयोध्या नगरीत तर लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि नव्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात सर्वत्र 'राममय' वातावरण तयार झालं आहे. अयोध्या नगरीत तर लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि नव्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मंगेशकर चौकात राहणाऱ्या निषाद परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी निषादांना राम लल्ला प्रतिष्ठापणानेसाठी निमंत्रण दिले.

पंतप्रधान मोदी अयोध्येत आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मोदी विमानतळावरुन रस्त्याच्या मार्गाने अयोध्याधाम रेल्वे स्टेशन येथे पोहोचले. रोडशोदरम्यान लोकांनी त्यांचे शंखनाद आणि फुलांचा वर्षाव करत उस्ताहात स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ६ वंदेभारत ट्रेन आणि २ अमृत भारत ट्रेन यांना हिरंवा झेंडा दाखवला. (who in nishad pm narendra modi invited for ram mandir inauguration)

पंतप्रधान मोदी यांनी निषाद कुटुंबियांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: रविंद्र मांझी आणि त्यांच्या कुटुंबियांना राम लल्लाच्या प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तसेच २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्धाटनासाठी येण्याचा आग्रह केला. यावेळी राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी रविंद्र मांझी यांच्या मुलांची देखील भेट घेतली. त्यांनी मीरा रांझी या लहान मुलीसोबत सेल्फी देखील काढला. सहावीत शिकणाऱ्या अनुज याने राम मंदिराच्या काढलेल्या पेंटिंगवर मोदींनी ऑटोग्राफ देखील केला. निषाद परिवाराच्या भेटीनंतर प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या १० कोटीव्या लाभार्थीच्या घरी देखील मोदी गेले. या महिलेच्या घरी जाऊन मोदींनी चहा देखील प्यायला.

निषाद कोण आहेत?

प्रभु राम जेव्हा सीता माता आणि लक्ष्मण सोबत वनवासाला जात होते. त्यानेळी निषाद राज यांनी त्यांना आपल्या जहाजातून शरयू नदी पार केले होते. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत ज्या निषाद परिवाराची भेट घेतली, ते निषाद राज यांचे वंशज असल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निषाद कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांच्या घरी जेवण देखील केलं होतं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : देशातील पहिली डबल डेकर आणि एटीएम सुविधा असलेली ‘पंचवटी एक्सप्रेस’ आज ५० वर्षांची!

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT