sarwan singh pandher  
देश

Farmers Protest: शेतकरी आंदोलन 2.0 मागील नेते सरवन सिंग पंढेर कोण आहेत? त्यांच्या एका आवाजाने हजारो आलेत दिल्लीत

शेतकरी आणि पोलीस-निमलष्करी दल यांच्यामध्ये संघर्ष झाल्याचं देखील पाहायला मिळत आहेत. अशात या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहे? अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. (who is behind farmers protest)

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी दिल्लीत धडकत आहेत. दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. यावेळी शेतकरी आणि पोलीस-निमलष्करी दल यांच्यामध्ये संघर्ष झाल्याचं देखील पाहायला मिळत आहेत. अशात या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहे? अशा प्रश्न अनेकांना पडला आहे.

२०२० मध्ये देखील शेतकरी दिल्लीत धडकले होते. यावेळी त्यांचे प्रमुख नेते राकेश टिकैत हे होते. यावेळी पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे महासचिव सरवन सिंग पंढेर आणि शेतकरी नेते जगजीत सिंह दल्लेवाल हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. माहितीनुसार, जवळपास २०० शेतकरी संघटना 'दिल्ली चलो'च्या आंदोलनात सहभागी आहेत. (who is behind farmers protest 2 in delhi sarwan singh pandher )

कोण आहेत सरवन सिंग पंढेरे? (Who is Sarvan Singh Pandher)

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नियोजन करणारे नेते सरवन सिंग पंढेरे (Sarvan Singh Pandher) हे पंजाबच्या अमृतसरचे आहेत. ते २००७ मध्ये किसान संघर्ष कमेटीतून वेगळे झाले होते. सतनाम सिंग पन्नू यांनी किसान मजदूर संघर्ष कमिटीची स्थापना केली होती. त्यात सरवन सिंग पंढेर सक्रीय झाले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी समोर ठेवलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करावे अशी त्यांनी मागणी आहे.

किसान मजदूर संघर्ष कमेटीचे कार्यक्षेत्र अमृतसर आहे. या संघटनेशी पंजाबमधील ७ ते ८ जिल्ह्यातील शेतकरी जोडले गेले आहेत. ही संघटना कायम शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे आलेली आहे. ४५ वर्षांचे सरवन सिंग पंढेर यांच्यावर मागच्या शेतकरी आंदोलनात हिंसा भडकवल्याचा आरोप होता. विद्यार्थी जीवनापासूनच ते आंदोलनात सक्रीय राहिले आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. असे असले तरी ते शेतकऱ्यांची बाजू मजबुतीने पुढे ठेवतात. त्यांना अकाली दलचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांचा जवळचं मानलं जातं.

सरवन सिंग पंढेरे यांनी पोलिसांवर आरोप केलाय की, हरियाणा आणि पंजाबमधील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. हरियाणाचं रुपांतर काश्मीर खोऱ्यासारखं झालं आहे. प्रत्येक गावात पोलीस पाठवले जात आहेत. पंजाब आणि हरियाणा दोन राज्य नसून आंतरराष्ट्रीय सीमा असल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.

शेतकरी आणि मजुरांना काँग्रेसचे समर्थन आहे हा आरोप सरवन सिंग पंढेर यांनी फेटाळून लावला. शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केवळ भाजप नाही तर काँग्रेस देखील जबाबदार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांना आम्ही दोषी समजतो. आम्ही डावे नाही. आम्ही कोणत्याही बाजूचे नाहीत. आम्ही केवळ शेतकरी आणि मजूर आहोत, असं ते म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT