D Purandeshwari 
देश

D Purandeshwari: लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या डी पुरंदेश्वरी कोण? चंद्राबाबूंना गप्प करण्यासाठी भाजपची खेळी!

लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या खासदार डी पुरंदरेश्वरी (Daggubati Purandeswari) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा सरकार केंद्रात आले आहे. मोदी सरकारने आपले कामकाज देखील सुरु केले आहे. भाजपला एकट्याने बहुमत मिळवता आलेले नाही, त्यामुळे घटक पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. एनडीएमधील सर्वात मोठा घटक पक्ष टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती. पण, भाजप अध्यक्षपद आपल्याचकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षपदासाठी एक नाव समोर येत आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या खासदार डी पुरंदेश्वरी (Daggubati Purandeswari) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. टीडीपीला काहीअंशी समाधानी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा तोडगा काढला असल्याचं बोललं जात आहे. डी पुरंदेश्वरी नेमक्या कोण आहेत हे आपण पाहुया.

डी पुरंदेश्वरी तेलुगु देसम पार्टीचे (TDP) संस्थापक आणि दिग्गज नेता एनटी रामाराव यांच्या कन्या आहेत. ६४ वर्षीय पुरंदेश्वरी या सध्याचे टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत. विशेष म्हणजे १९९६ मध्ये जेव्हा एनटी रामाराम यांचा सत्ताबदल झाला होता, तेव्हा पुरंदेश्वरींनी नायडू यांचे समर्थन केले होते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा झाली होती.

पुरंदेश्वरी यांचे शिक्षण चेन्नईमध्ये झाले आहे, त्यांनी १९७९ मध्ये साहित्यामध्ये बीए केलं आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी फिल्म प्रोड्युसर दग्गुबाती रामानायडू यांचा पराभव केला होता. पहिल्यांदा त्या बापटना लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांनी राजमहेंद्रवरम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना २.४० लाख मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी निवडणुकीत वायएसआर काँग्रेसच्या श्रीनिवास यांचा पराभव केला आहे.

२००४ मध्ये पुरंदेश्वरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००९ मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये त्या मानव संसाधन विकास राज्यमंत्री राहिल्या आहेत. २०१२ मध्ये यूपीए सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राज्यमंत्री पद सांभाळलं आहे.

२०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश

आंध्र प्रदेशची दोन शकले करण्याच्या निर्णयावर पुरंदेश्वरी काँग्रेसवर नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ७ मार्च २०१४ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या त्या आंध्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष आहेत. २०२० मध्ये त्या ओडिशाच्या प्रभारी होत्या. त्यांनी भाजपमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना दक्षिणेच्या सुषमा स्वराज म्हणून देखील ओळखलं जातं.

पुरंदेश्वरी या कम्मा समूदायातून येतात. शिवाय त्या चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी असल्याने त्यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर असणार आहे. नायडू यांना डी पुरंदेश्वरी यांना विरोध करणे अवघड जाणार आहे. पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्ष करून कम्मा समूदाय भाजपला आपल्याकडे वळवायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder : आयुष कोमकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या, कोण आहे गणेश काळे, कसं संपवलं?

Latest Marathi News Live Update : जेद्दाहहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट ६ई ६८ ला सुरक्षेचा धोका

Girish Mahajan : जळगाव महापालिकेत यंदा भाजप 'रेकॉर्ड ब्रेक' कामगिरी करणार; विरोधी पक्षात कोणी उरले नाही: गिरीश महाजन

Water Supply Cut: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १८ तास पाणीबाणी, कधी अन् कुठे?

Dhule News : धुळे ग्रामीणला मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त १६ हजार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजारांचे विशेष पॅकेज मंजूर

SCROLL FOR NEXT