DGP Rajeev Kumar  
देश

Rajeev Kumar: ममतांनी ज्या अधिकाऱ्यासाठी केलं होतं धरणे आंदोलन..त्याचीच निवडणूक आयोगाकडून बदली; राजीव कुमार कोण आहेत?

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवून त्यांना आयटी डिपार्टमेंटचा सेक्रेटरी बनवलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवून त्यांना आयटी डिपार्टमेंटचा सेक्रेटरी बनवलं आहे. त्यांच्या जागी आता विवेव सहाय हे पोलीस प्रमुखाची जबाबदारी सांभाळतील. ((Who is DGP Rajeev Kumar transferred by the Election Commission tmc Mamata banarjee officer loksabha 2024)

सहाय यांनी याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली आहे. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान ममतांच्या पायाला जखम झाली होती. त्यावेळी त्यांना निलंबित करण्यात आले होते.

पश्चिम बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार हे अनेक वादांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर उघडपणे तृणमूलला पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीआधी ते कोलकाताचे पोलीस कमीशनर होते. त्यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी ममतांच्या इशाऱ्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर त्यांना तेव्हा पदावरुन हटवण्यात आलं होतं. पण, निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस कमिशनर करण्यात आलं होतं.

अधिकाऱ्यासाठी धरणे आंदोलन

राजीव कुमार हे त्यामुळेच ममता बॅनर्जी यांचे जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे जेव्हा सीबीआयने राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकला होता, तेव्हा ममतांनी धरणे आंदोलन केले होते. शारदा चिट फंड प्रकरणी सीबीआयने राजीव कुमार यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. ममतांनी याविरोधात तब्बल ७० तास धरणे आंदोलन केले होते. सुप्रीम कोर्टाने जेव्हा राजीव कुमार यांच्या अटकेला स्थगिती दिली. तेव्हा कुठे ममतांनी माघार घेतली होती. कुमार यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

विशेष म्हणजे मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच पश्चिम बंगालच्या डीजीपी पदावर राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. याआधी आयटी डिमार्टमेंटचे सचिवपद ते सांभाळत होते. त्यांच्या बदलीवरुन आता वादाला तोंड फुटले आहे.

यावरुन राजकारणाला सुरुवात झालीये. राजीव कुमार हे सत्ताधारी पक्षाचे काळे कारणामे लपवून ठेवत होते. संदेशखाली प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहां शेखला ते वाचवत होते, असं सीपीआय(एम) नेते मोहम्मद सलीम म्हणालेत. भाजपकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. दुसरीकडे तृणमूलने आरोप केलाय की निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहे.

राजीव कुमार कोण आहेत?

उत्तर प्रदेशचे असलेले राजीव कुमार यांची पहिली पोस्टिंग चंदननगरमध्ये झाली होती. त्यानंतर ते बीरभूमचे एसपी झाले. २००८ मध्ये ते कोलकाता एसटीएफचे जॉईंट कमिशनर होते. शारदा चिटफंड प्रकरणात राजीव कुमार यांची टीम आरोपींना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेली होती. यानंतर काही महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT