Asaram Bapu Sakal
देश

Asaram Bapu : आठ वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या आसारामचं दहा हजार कोटींच्या साम्राज्याचं काम कोण पाहतं?

आसाराम बापूच्या साम्राज्यामध्ये 400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 पेक्षा जास्त गुरुकुल आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचे धार्मिक साम्राज्य दहा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ट्रस्ट या मालमत्तेची देखरेख करतो आणि त्यांच्या सगळ्या व्यवहारांचं व्यवस्थापन करतो. आसारामच्या देशभर पसरलेल्या आश्रमशाळांचे प्रमुख म्हणून आता कोण काम करत आहे? जाणून घ्या....

आसाराम किंवा तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीत. ही जबाबदारी आता आसाराम यांची कन्या भारतश्री पार पाडत आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करतात.

भारतश्रीसोबत राहणार्‍यांचं म्हणणं आहे की, खूप प्रवास करते तसंच, देशभरातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या आश्रमांचे दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहारही नियंत्रित करते. पण, आसारामप्रमाणे ती वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रवचनांसारखा कोणताही कार्यक्रम करत नाही. मीडियासमोरही ती फारशी येत नाही.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

आसारामने अहमदाबादमध्ये पहिला आश्रम स्थापन केला. भारतश्रीचा जन्म १९७५ मध्ये झाला. २०१३ मध्ये आसारामला अटक झाली तेव्हा भारतश्री आणि आसारामची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. गेल्या सुमारे ८ वर्षांत भारतश्रीची पकड खूप मजबूत झाल्याचं काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

आसाराम बापूच्या साम्राज्यामध्ये 400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 पेक्षा जास्त गुरुकुल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT