who is pradeep kurulkar drdo scientist honeytrapped by isi know connection with rss shakha
who is pradeep kurulkar drdo scientist honeytrapped by isi know connection with rss shakha  
देश

Pradeep Kurulkar : संघाची शाखा ते पाकला गुप्त माहिती देणं; हनीट्रॅपमध्ये अडकलेले 'ते' DRDO संचालक कोण?

रोहित कणसे

पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या चर्चेत आहेत. कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने त्यांना अटक केली आहे. कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड ॲनलसिस विंग- रॉ) चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे गिरवलेले कुरुलकर नेमके आहेत कोण? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

कुरूलकरांचा संघाच्या शाखेशी संबंध…

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोपाखाली अटक असलेले प्रदीप कुरुलकर यांनी 'नूमवीय' या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगा हा देखील सहभागी झाले होते. या मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या संघाच्या शाखेतील दिवसांबद्दल माहिती दिली.

कुरूलकर त्यांच्या मुलाखतीत सांगतात की, माझा मुलगा आता संघकार्यात जातो, ही आमची चौथी पीढी आहे. माझे आजोबा शाखेत फक्त जायचे. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं. ते अतिशय चांगले गणिती होते. त्यांचे हिशोब पक्के असल्याने शाखेची गंगाजळी, टिपणं ठेवणं असं काम त्यांच्याकडं होतं. ते काम नंतर वडिलांकडे आलं. ते गणित आणि विज्ञानाचे शिक्षक होते, असंही कुरूलकर या मुलाखतीत सांगतात.

त्यांनी पुढे या मुलाखतीमध्ये सांगितलं की, बंगळूरूवरून पुण्यात येऊन संघघोष शिकणारे सुब्बू श्रीनिवास हे मला पहिल्यांदा शाखेत घेऊन गेले. त्यांचा हात धरून मी मोतीबागेत गेलो.

तसेच वयाची पाच वर्ष पूर्ण झाल्यापासून ते शाखेत जात असल्याचंही त्यांनी मान्य केलं. तेव्हा रस्ता ओलांडताना मदत लागायची, कोणीतरी घेऊन जायचं, नंतर रस्ता ओलांडून स्वतंत्र्यपणे जाता यायला लागलं तेव्हापासून तो संध्याकाळच्या माझ्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग होता, असे कुरुलकर म्हणतात.

अनेक वर्ष मी संघशिक्षा वर्ग झाल्यानंतर प्रचारकांची बैठक असे, त्याची सुरूवात बाबाराव भिडे करायचे. काही वर्ष मी त्यांच्या बौध्दिकांची टिपणं काढण्याचं देखील काम केलं आहे असेही त्यांनी सांगितलं.

शिक्षण आणि कारकिर्द

मींट'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (DRDO) एक भाग असलेल्या संशोधन आणि विकास आस्थापनेच्या (अभियंता) [R&DE(E)] सिस्टम्स अभियांत्रिकी प्रयोगशाळेत संचालक म्हणून प्रदीप कुरुलकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

१९६३ मध्ये जन्मलेल्या प्रदीप कुरुलकर यांनी १९८५ मध्ये सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (BE) पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये CVRDE, Avadi येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये आपली कारकिर्द सुरू केली. पुढे त्यांनी आयआयटी कानपूरमधून ड्राइव्ह आणि अॅप्लिकेशन्सवर लक्ष केंद्रित करत पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पुढील शिक्षण सुरू ठेवलं.

कुरुलकर हे रॉकेट लाँचर, लष्करी अभियांत्रिकी उपकरणे, अडव्हांस रोबोटिक्स आणि लष्करी वापरासाठी मोबाईल मानवरहित प्रणाली डिझाइन आणि विकसित करण्यात तज्ज्ञ आहेत.

प्रमुख डिझायनर आणि टीम लीडर म्हणून अनेक लष्करी अभियांत्रिकी उपकरणे आणि सीस्टम्स विकसित आणि डिझाइन करण्यात कुरुलकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये हायपरबेरिक चेंबर्स, हाय प्रेशर Pneumatic सीस्टम्स, मोबाईल पॉवर सप्लाय आणि AD, MRSAM, निर्भय सबसोनिक क्रूझ मिसाइल सिस्टम, प्रहार, QRSAM आणि XRSAM सारख्या विविध प्रोग्राम्ससाठी क्षेपणास्त्र प्रक्षेपक यांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाशी गोपनिय माहिती व्हॉटसअ‍ॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलने शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत संशयास्पद हालचालीवरून एटीएसने अखेर त्यांना अटक केली.

कुरुलकर यांच्याकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे ‘डीआरडीओ’च्या अहवालातून समोर आले आहे. कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते.

त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते. चौकशीत कुरुलकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता.

याबाबत डीआरडीओच्या दिल्ली मुख्यालयातील कर्नल प्रदीप राणा यांनी मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुलकर यांना ९ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT