Rajasthan Election Esakal
देश

Rajasthan Election: मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा भाजपला सवाल

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील केकाडी येथील सभेत त्या बोलत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

‘‘भाजप विधानसभेची निवडणूक लढत आहे, परंतु निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची कुणालाच काही कल्पना नाही. आता भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार दुर्बिणीतून शोधत आहेत. भाजपचे नेते एकमेकांना हिट विकेट करण्याच्या प्रयत्नात आहेत,’’ असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे.

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील केकाडी येथील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते. यावेळी प्रियांका गांधी यांनी भाजपच्या अंतर्गत गटबाजीवर टोले हाणले. त्या म्हणाल्या, ‘‘भाजपचे नेते निवडणूक लढवीत आहेत. आता लोक विचारत आहेत की, मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावर भाजपचे नेते पंतप्रधान मोदींचा चेहरा समोर करीत आहेत. राजस्थानमधील भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्री कोण होणार याची काही खबरबात नाही. या पदासाठी इच्छुक एकमेकांना ‘हीट विकेट’ करण्याच्या मागे लागले आहेत.’’

"पंतप्रधान मोदी म्हणतात, राजस्थानमधील काँग्रेसचे नेते एकमेकांना रनआउट करीत आहेत. परंतु आम्ही सर्व एकत्र आहोत. एकोप्याने निवडणूक लढवीत आहोत. गेल्या पाच वर्षांतील विकास कामे तुमच्यासमोर आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहोत".

"आरोग्य योजनेतून लोकांना फायदा झाला, कोरोनाच्या काळात राज्य सरकारने मदत केली. गॅस सिलिंडर ५०० रुपयांत दिला. जुनी पेन्शन योजना लागू केली. राजस्थानच्या जनतेसाठी पैशाला काहीही कमी नाही. भाजपचे नेते म्हणतात आमच्याकडे पैसा नाही. मग अदानींचे कर्ज कसे माफ होत आहे. जनतेच्या पैशातून उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करायचे, हे चालणार नाही," असे प्रियांका गांधी म्हणाल्या. काँग्रेसची नीती ही सामान्य लोकांच्या विकासासाठी असल्याचा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT