Vikas Divyakirti 
देश

Vikas Divyakirti: 'UPSC' विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर विकास दिव्यकीर्ती देखील गोत्यात, IAS कोचिंग सेंटरमधून किती होते कमाई?

Who is Vikas Divyakirti?: तिघांच्या मृत्यूमुळे दिल्लीतील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कार्तिक पुजारी

नव दिल्ली- राजेंद्रनगरमध्ये दुर्दैवी अपघातामध्ये यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. राव स्टडी सर्कल बिल्डिंगच्या तळघरातील लायब्रेरीमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची झळ दृष्टी आयएएसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांना देखील बसली आहे. कारण, प्रशासनाने दिल्लीतील अनेक आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाई केली आहे. यात त्यांच्या कोचिंग सेंटरचा देखील समावेश आहे.

तिघांच्या मृत्यूमुळे दिल्लीतील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन देखील केलं आहे. विकास दिव्यकीर्ती यांच्या घराबाहेर देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर दिव्यकीर्ती कोण आहेत याबाबत लोक सर्च करत आहेत. त्यांच्याबाबत आपण जाणून घेऊया.

हरियाणात झाला जन्म

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा जन्म २६ डिसेंबर १९७३ मध्ये हरियाणात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडील महर्षि विद्यापीठातील प्रसिद्ध हिंदी साहित्य प्रोफेरस होते. त्यांच्या आई देखील शिक्षिका होत्या. डॉ. विकास दिव्यकीर्ती हे स्वत: प्रसिद्ध प्रोफेसर आणि लेखक आहेत. त्यांना दोन भाऊ आहेत. एक भाऊ इंजिनीअर असून तो अमेरिकेत असतो, तर दुसरा भाऊ CBI मध्ये डिआयजी आहे.

दिव्यकीर्ती यांचे प्राथमिक शिक्षण हरियाणामध्येच झाले आहे. त्यांनी दिल्लीच्या झाकिर हुसैन कॉलेमधून पदवी घेतली आहे. त्यांनी हिंदी विषयात बीए केलं आहे. त्यानंतर त्यांनी एमए आणि एमफील आणि पीएचडी देखील केली आहे. त्यांची शिकवण्याची कला वेगळी आहे. सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. याशिवाय ते मोटिवेशनल स्पिकर देखील आहेत.

प्रशासकीय सेवेचा राजीनामा

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी दिल्ली विद्यापीठातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याठिकाणी ते शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. १९९६ मध्ये ते यूपीएससीची कठीण परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा ऑल इंडिया रँक ३८४ आला. त्यांनी अधिकारी म्हणून गृह मंत्रालयात काम देखील केलं. पण, अधिकारी होण्यापेक्षा शिक्षक होणं त्यांना अधिक पसंत होतं. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय सेवेला रामराम ठोकला आणि, १९९९ मध्ये त्यांनी दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरची स्थापना केली.

विकास दिव्यर्कीती यांची कमाई किती?

विकास दिव्यकीर्ती यांचे एकूण उत्पन्न २५ कोटी रुपये आहे. पण, त्यांच्या कमाईमध्ये बदल होत असतो. त्यांचा कमाईचा मुख्य स्रोत यूट्यूब चॅनेल, दृष्टी IAS कोसिंच क्लासेस, पुस्तके, लेक्चर आणि वर्कशॉप हे आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न २ कोटींच्या जवळ आहे. म्हणजे महिन्याला ते २० लाख रुपये कमावतात. यूट्यूबवर त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT