Vishal Rahul Alise Kalu|Salman Khan  Esakal
देश

Salman Khan: वर्षभरापासून फरार, बुकीचा खून अन्... कोण आहे सलमानच्या घरावर गोळीबार करणारा विशाल उर्फ कालू?

Kalu Shooter: शूटर कालू हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे आणि एका बुकीची हत्या करून तो प्रसिद्धीझोतात आला होता.

आशुतोष मसगौंडे

Who Is Kalu Alise Vishal Rahul:

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर काल पहाटे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आरोपींना पकडण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. मात्र, ते आतापर्यंत हाती लागू शकले नाहीत.

दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे. तो गुरुग्रामचा रहिवासी असून, विशाल राहुल उर्फ ​​कालू असे त्याचे नाव आहे.

कोण आहे विशाल राहुल?

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच्यावर गोळीबार आणि दुचाकी चोरीचे ५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतकमध्ये एका बुकीची हत्या केली होती.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेत तो गोळीबार करताना दिसत आहे. विशाल हा राजस्थानचा कुख्यात गुंड रोहित गोदाराचा शूटर आहे.

रोहित गोदरा (Rohit Godara) हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची तार हरियाणाशी जुळत असल्याने हरियाणा पोलिसही या प्रकरणात सक्रिय झाले आहेत.

दरम्यान कालूचे नाव अनेक गुन्ह्यांमध्ये आल्याने तो गेल्या फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांची छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यामध्ये एक हल्लेखोर काळ्या आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. दुसरा लाल टी-शर्टमध्ये आहे. यासोबतच 29 फेब्रुवारी 2024 चे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, जे हरियाणाच्या रोहतकमधील ढाब्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामध्ये विशाल उर्फ कालू नावाचा तरुण दिसत आहे. मुंबईतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा त्याच्याशी जुळत असून, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा विशाल राहुल उर्फ ​​कालू असल्याचे बोलले जात आहे.

शूटर कालू हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे आणि एका बुकीची हत्या करून तो प्रसिद्धीझोतात आला होता.

या प्रकरणामध्ये कालूचे नाव समोर आल्यानंतर कालूच्या बहिणीने काही खुलासे केले आहेत.

कालूच्या बहिणीने सांगितले की, तिचा भाऊ गेल्या फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता आहे आणि त्याचा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संपर्क नाही. कालूच्या बहिणीने सांगितले की तिला तिच्या भावाची खूप काळजी वाटते. कालूच्या बहिणीने सांगितले की, 7 मार्च 2024 पासून पोलिस तिच्या घरी येऊन वारंवार कालूची चौकशी करत आहेत, असे वृत्त आजतक या संकेत स्थळाने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT