Chhattisgarh CM
Chhattisgarh CM 
देश

Chhattisgarh CM: सरपंच, 4 वेळा खासदार अन् केंद्रात मंत्री... कोण आहेत छत्तीसगडचे होणारे मुख्यमंत्री विष्णू देव साय

Sandip Kapde

Chhattisgarh CM: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावरून निर्माण झालेला सस्पेंस संपला आहे. विष्णू देव साय यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी भारतीय जनता पक्षाच्या 54 नवनिर्वाचित आमदारांची आज (रविवार) रायपूर येथील भाजप कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत विष्णू देव साय यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

विष्णू देव साय यांचे नाव फायनल झाल्यानंतर त्यांचे चाहते जल्लोष करत आहेत. ढोलताशाच्या तालावर कार्यकर्त्यांसह नेते नाचताना दिसत होते. कुशाभाऊ ठाकरे संकुलाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी वाद्य वाजवून फटाके फोडून आनंद साजरा केला. दरम्यान  विष्णू देव साय कोण आहेत हे जाणून घेऊया.

विष्णू देव साय छत्तीसगडच्या कुंकुरी विधानसभेतून आले आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. विष्णू देव याच समाजातील आहेत. अजित जोगी यांच्यानंतर छत्तीसगडमध्ये या समाजातील कोणीही मुख्यमंत्री होऊ शकला नाही. यावेळी आदिवासी समाजातून आलेल्या साय यांच्या माध्यमातून भाजप संपूर्ण देशाला संदेश देत आहे.

विष्णू देव साय यांनी 1980 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. ते 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. साय खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. याशिवाय ते आरएसएस आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही जवळचे आहेत. विष्णु देव साय यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1964 रोजी जशपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय पोलाद राज्यमंत्री होते. 16व्या लोकसभेत छत्तीसगडमधील रायगडमधून विजयी होऊन ते खासदार झाले. (Latest Marathi News)

1990-98 मध्ये ते दोनदा आमदार होते. यानंतर ते 1999 ते 2014 पर्यंत खासदार झाले. खासदार असताना त्यांनी अनेक समित्या आणि पदे भूषवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1980 मध्ये बगिया येथून सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध जिंकली होती. यानंतर 1990 मध्ये पहिल्यांदा त्यांनी आपल्या मालमत्तेचा काही भाग विकून आमदारकीची निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT