akali-dal and bjp 
देश

दिल्ली विधानसभेच्या रणांगणात अकाली दलाने कोणाला दिला पाठिंबा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाचा नागरिकत्व कायद्यावरून असलेला (सीएए) रुसवा दूर करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला यश आले आहे. पक्षनेते सुखबीरसिंग बादल यांनी आज अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्यावर अकाली दल दिल्लीत भाजपच्याच पाठीशी असल्याचे सांगितले. यामुळे भाजपला दिल्लीपासून हिमाचल प्रदेश, हरियाना व पंजाबपर्यंत दिलासा मिळाला आहे.

सरकारने नागरिकत्व कायद्यातून पाकपीडित मुस्लिमांना वगळल्याने अकाली दलाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीत याच्या निषेधार्थ आपण विधानसभा निवडणुका लढविणारच नाही, अशी घोषणा या पक्षाचे दिल्लीप्रमुख मनजिंदरसिंग सिरसा यांनी मागील महिन्यात केली होती.

भाजपमधून त्यानंतर सुखबीर बादल, हरसिमरत कौर व वरिष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. दिल्लीत पंजाबी मतदार फार मोठ्या संख्येने राहतो व तो प्रभावी आहे. केजरीवालांच्या करिष्म्यासमोर धापा टाकणाऱ्या भाजपला अकाली दलाला दुखावणे काही केल्या परवडणारे नव्हते. सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांच्या पातळीपर्यंतही प्रयत्नांना अपेक्षित यश येईना तेव्हा स्वतः मोदींना सूत्रे हाती घेऊन बादल पितापुत्रांशी चर्चा करावी लागली. त्यानंतर सुखबीर बादल यांनी आज दिल्लीत येऊन भाजपचे नामधारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही दोन्ही पक्षांत नाराजी नाहीच, असे भासवत पत्रकारांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता विद्यापीठातही ‘अभियांत्रिकी’चे शिक्षण; ‘या’ ८ अभ्यासक्रमांना मंजुरी, २८० प्रवेश क्षमता, वाचा...

आजचे पंचांग २७ जून २०२६! शनिप्रदोष, शिवराज्याभिषेक दिन, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

SCROLL FOR NEXT