आणखी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...!

वृत्तसंस्था
Thursday, 30 January 2020

महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी केली जात आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर निर्माणाधीन आहे. या अंतर्गत रेल्वे 300 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, तर सेमी हाय स्पीड रेल्वे गाड्या या 160 किमी प्रति तास या वेगाने धावतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

- Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात...

केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (ता.1) जाहीर करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'तयार करण्यात येणाऱ्या सहा कॉरिडॉरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किमी) आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे.' 

तसेच, महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे. 

- INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो!'

एक वर्षाच्या आत डीपीआर

यादव म्हणाले की, 'या सहा कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन उपलब्धता, संरेखन आणि तेथील रहदारी या गोष्टींचाही विचार करण्यात येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हाय स्पीड किंवा सेमी हाय स्पीड कॉरिडॉर बनवायचे, याबाबतच निर्णय नंतर घेण्यात येईल.' 

पहिल्या बुलेट ट्रेनसाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार

'मुंबई-अहमदाबाद या दरम्यान तयार करण्यात येणारा देशातील पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे 90 टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल,' अशी माहितीही यादव यांनी दिली. 

- Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

या प्रकल्पासाठी आम्हाला एकूण 1380 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. 1005 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 471 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर 149 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 119 हेक्टर जमीन आम्हाला मिळाली आहे. उर्वरित 128 हेक्टर जमीन ही हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 more routes of identified for high speed corridors declared by railway officials