Indian Dancer shot dead in US
Indian Dancer shot dead in US Esakal
देश

Indian Dancer shot dead in US: भारतीय क्लासिकल डान्सरची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या; ४ दिवसांनंतरही तपासाबाबत माहिती नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

Indian Dancer shot dead in US: अमेरिकेत एका ३४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तो क्लासिकल डान्सर होता. जानेवारी 2024 पासून 5-6 विद्यार्थ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. आता अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 34 वर्षीय मृत अमरनाथ वॉशिंग्टन विद्यापीठाचा विद्यार्थी होता. तो क्लासिकल डान्सर होता. सेंट लुईस, मिसुरी येथे त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. तो कुचीपुडी आणि भरतनाट्यम करत होता. सेंट लुईस अकादमी आणि सेंट्रल वेस्ट एंड परिसरात त्याच्यावर अनेक वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तो गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधून अमेरिकेला गेला होता.

'5 ऑन युवर साइड'च्या वृत्तानुसार, सेंट लुईस मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाने सांगितले की, डेलमार बुलेवर्ड आणि क्लॅरेंडन अव्हेन्यू येथे मंगळवारी संध्याकाळी 7:15 वाजता गोळीबार झाला. मृत घोष हा वॉशिंग्टन विद्यापीठाच्या 'परफॉर्मिंग आर्ट्स' विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत होता. घोष हा बंगालमधील सुरी शहरातील रहिवासी होता. तो कलाश्रेष्ठ, चेन्नई या प्रतिष्ठित संस्थेचा माजी विद्यार्थी होता.

घोष यांच्या काकांनी सांगितले की, मृत्यूची संपूर्ण माहिती मिळालेली नाही

दरम्यान, अमरनाथचे काका श्यामल घोष यांनी सांगितले की, या घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्या पुतण्याच्या अमेरिकेत मृत्यू झाल्याची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रसारमाध्यमांनी अमरनाथची मैत्रिण हिमा कुप्पा हिच्या हवाल्याने सांगितले की, “तो बॅले डान्स शिकत होता. मला वाटते की, त्याला वॉशिंग्टन विद्यापीठाची पूर्ण शिष्यवृत्ती होती. नृत्यात पीएचडी करण्याचे आणि आमच्या कुचीपुडी आर्ट अकादमीमध्ये पूर्णवेळ काम करण्याचे त्याचे स्वप्न होते.”

अमरनाथच्या हत्येनंतर शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने स्थानिक पोलीस आणि विद्यापीठाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया 'X' वर पोस्ट करून मृतांच्या नातेवाईकांना शक्य ती सर्व मदत करण्याचा उल्लेख केला आहे. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी सेंट लुईस पोलिस आणि विद्यापीठाकडे हे प्रकरण मांडल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमरनाथचे काका श्यामल घोष म्हणाले, "आम्ही त्याच्याबद्दल अनेक स्त्रोतांकडून ऐकले होते परंतु आजपर्यंत आम्हाला त्याच्या मृत्यूबद्दल संपूर्ण माहिती मिळालेली नाही." अमरनाथचे आई-वडील आता हयात नाहीत. अमरनाथ बंगालमधील सुरी शहरातील सुभाष पल्ली भागात राहत होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येची ही सहावी घटना आहे. 2024 च्या सुरुवातीपासून अमेरिकेत किमान 6 भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, आजतागायत भारताच्या बाजूने यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. याआधी जान्हवी कंदुला या भारतीय व्यावसायिकासह अनेकांचा मृत्यू झाला आहे. या बातम्यांमुळे भारतीयांच्या मनात दहशत निर्माण होत आहे. हे द्वेषी गुन्हेगारीचे प्रकरण आहे का? या मृत्यूंविरोधात भारत काय भूमिका घेते हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT