supreme-court sakal
देश

बंदी घातलेल्या फटाक्यांची सरसकट विक्री

सर्वोच्च न्यायालय ; पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी हवी

सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

नवी दिल्ली : हरित फटाक्यांच्या नावाखाली काही फटाके उत्पादकांकडून बंदी घालण्यात आलेल्या कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांची सरसकट विक्री होताना दिसते असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने आज याआधी आम्ही अशा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिलेल्या आदेशांची राज्यांनी अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे. न्या. एम.आर. शहा आणि न्या.ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही पण त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात घातला जाऊ नये, असे मतही न्यायालयाने मांडले.

न्यायालय म्हणाले की,‘‘ केवळ फटाक्यांची मोठी आतषबाजी म्हणजे उत्सव नव्हे, तुम्ही आवाज न करणाऱ्या फुलबाजीच्या माध्यमातून आनंद घेऊ शकता. आम्ही याआधी दिलेल्या आदेशांची सर्वच राज्यांनी अंमलबजावणी करावी. तुम्ही कोणत्याही राज्यात अथवा शहरामध्ये जा किंवा उत्सावात सहभागी व्हा, तिथे तुम्हाला अशा फटाक्यांची बाजारात उघडपणे विक्री होत असल्याचे दिसून येते. याबाबत आम्ही दिलेल्या आदेशांची पालन होणे गरजेचे आहे. हा एखाद्या घटकाच्या वापराचा प्रश्‍न नाही. काही बंदी घालण्यात आलेली उत्पादने सरसकट विकली जातात आणि लोकांकडून त्यांचा वापरही होतो. या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असताना देखील ती बाजारपेठेमध्ये कशी उपलब्ध होतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT