hydroxychloroquine 
देश

‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’ औषधाचा वापर कोणासाठी?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा गंभीर धोका असलेले रूग्ण आणि कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या गोळ्यांचा वापर करावा असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. या संस्थेच्या कृती गटाने जारी केलेल्या ताज्या दिशा निर्देशांत या सूचनांचा समावेश आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून या गोळ्यांची सर्वत्र  चर्चा होती. अमेरिकेच्या अन्न आणि प्रशासन विभागाने या गोळ्यांच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब केले होते. भारतात या गोळ्यांचे जगाच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होते हे लक्षात घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, या गोळ्या भारताने अमेरिकेला द्याव्यात, अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकीच  दिली होती. त्यानंतर भारताने तात्काळ निर्यातीवरील निर्बंध मागे घेऊन अमेरिकेसह सुमारे ६० देशांना या गोळ्यांचा पुरवठा केला होता. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरते असे भारताने  अधिकृतरीत्या म्हटलेले नाही.

लहान मुलांना औषध नको
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना या औषधाच्या गोळ्या उपचार म्हणून द्याव्यात असे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. प्रयोगशाळांकडून ज्या संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या गोळ्यांचा डोस द्यावा.  पंधरा वर्षांच्या आतील मुलांना मात्र या गोळ्या देऊ नयेत असे या निर्देशांत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Kunjirwadi Civic Issues: कुंजीरवाडीत गॅस लाईन कामामुळे खड्डे, फुटलेल्या पाणी-ड्रेनेज लाईन्स; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा

Pune Highway CCTV: अष्टविनायक महामार्गावरील शिंगवे फाट्यावर चार उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही; वाहतूक नियंत्रण व गुन्हे प्रतिबंधाला चालना

SCROLL FOR NEXT