देश

महंत नरेंद्र गिरींना का दिली भू-समाधी? काय आहे ही परंपरा?

सकाळ डिजिटल टीम

प्रयागराज: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील बाघंबरी मठाचे महंत नरेंद्र गिरी यांना आज बुधवारी भू-समाधी देण्यात आली आहे. गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अशी इच्छा व्यक्त केली होती की, त्यांना बाघंबरी मठातच त्यांच्या गुरुच्या समाधीजवळ भू-समाधी दिली जावी. त्यांच्या या इच्छेनुसारच दिवंगत महंतांचा अंतिम संस्कार समाधी देऊन पार पाडण्यात आला आहे.

नरेंद्र गिरी यांना भू-समाधी देण्याआधी फूलांनी सजलेल्या रथावरुन त्यांना गंगा-यमुना-सरस्वती संगमाच्या तटावर नेण्यात आलं. त्यांना स्नान दिलं गेलं. त्यानंतर त्यांना तटावरील मोठ्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेलं गेलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव बाघंबरी मठात नेण्यात आलं. त्यांना समाधी देण्याआधी खोदलेल्या समाधी स्थळाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यांनी लावलेल्या निंबाच्या झाडाखालीच त्यांना ही समाधी देण्यात आली आहे.

भू-समाधीचा काय आहे इतिहास?

भारतातील अनेक संतांनी भू-समाधी घेतली आहे. असं म्हटलं जातंय की ही परंपरा 1200 वर्षांहून अधिक जुनी आहे. आदिगुरु शंकराचार्यांनी देखील भू-समाधी घेतली होती आणि त्यांची समाधी केदारनाथमध्ये आज देखील असल्याचं म्हटलं जातं. नरेंद्र गिरींवर अंतिम संस्कार परंपरेनुसार केलं गेलं. सनातन धर्मानुसार, संत परंपरेमध्ये तीन प्रकारचे संस्कार असतात. यामध्ये दाह संस्कार, भू-समाधी आणि दल समाधी समाविष्ट असते. अनेक संतांना त्यांच्या मृत्यूनंतर वैदिक पद्धतीने दाह संस्कार केला जातो. अनेक संतांनी जल समाधी देखील घेतली आहे. मात्र, नद्यांमध्ये होणाऱ्या जलप्रदुषणाची बाब लक्षात घेता आता हे प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे अधिकतर संतांना भू-समाधी देण्याची पंरपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT