narendra modi and mamta banarjee. 
देश

Narendra Modi : ...तर मग ममतांविषयीच्या 'त्या' वक्तव्यासाठी मोदींवर कारवाई का नाही? TMCचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे त्याचं लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले. आता या प्रकरणाचा राजकीय भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) आता पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

टीएमसीने म्हटले की, जर राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, तर पंतप्रधान मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान 'दीदी ओ दीदी' म्हणत सीएम ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. मात्र असे असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

टीएमसी नेते आणि सीएम ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, निवडणूक प्रचारादरम्यान केवळ पंतप्रधान मोदींनी दीदी ओ दीदी...शब्द वापरले नाही. उलट भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हे शब्द मुख्यमंत्री ममता यांच्यावर टीका करण्यासाठी वापरले होते. त्या भाजप नेत्यांमध्ये शुभेंदू अधिकारी यांचाही समावेश होता.

अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, अनुसूचित जातीच्या मंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल एका महिन्याच्या आत शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी दीदी ओ दीदी म्हणत सर्व महिलांचा अपमान केला होता. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचे सदस्यत्व रद्द का करू नये?

ते पुढे म्हणाले की, 'मोदी ओ मोदी' म्हटल्याने ओबीसींचा अपमान होतो आणि राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा होते, तर येथील विरोधी पक्षनेत्यांनाही दोन वर्षांची शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यासाठी देशाचा कायदा वेगळा आहे का? आम्ही टीएमसीमध्ये आहोत म्हणून कायदे वेगळे आहेत आणि ते भाजपमध्ये आहेत म्हणून कायदे वेगळे आहे का, असा सवाल बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरातील सागवान तस्करांना राजकीय राजाश्रय मिळतो का?

सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

Grandmother Rescue Story: राहुरीत भीषण आग; नातींना वाचवण्यासाठी आजीची ज्वाळांत उडी, जीवावर बेतलं धाडस, नेमकं काय घडलं!

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT