Republic Day  sakal
देश

Republic Day : २६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण का करणार नाहीत ?

१५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करण्याची पद्धत आहे; मात्र २६ जानेवारीला पंतप्रधान ध्वजारोहण करत नाहीत.

नमिता धुरी

मुंबई : भारतात तिरंगा फक्त स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान या नात्याने ध्वजारोहण करतात.

१५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करण्याची पद्धत आहे; मात्र २६ जानेवारीला पंतप्रधान ध्वजारोहण करत नाहीत. याउलट, राष्ट्रपती झेंडा फडकवतात. असे का ?

२६ जानेवारी विशेष का आहे ?

यावर्षी आपण ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. हा दिवस भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा करतो.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. २६ जानेवारी हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. अशा स्थितीत राजधानी दिल्लीत या दिवशी एक भव्य संचलन आयोजित केले जाते आणि सांविधानिक प्रमुख राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

२६ जानेवारीला पंतप्रधान तिरंगा का फडकवत नाहीत ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाचा प्रमुख पंतप्रधान असायचा. त्यामुळे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले होते.

२४ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि ते देशाचे घटनात्मक प्रमुख बनले. या कारणास्तव, देशाचे राष्ट्रपती २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करतात.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नरेंद्र मोदी ध्वजारोहण करणार नाहीत. हे काम करण्याचा मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu) यांच्याकडे असेल.

ठिकाण

स्थळाबद्दल सांगायचे तर, प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथ येथे आयोजित केला जातो आणि राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT